गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा gudi padwa 2024
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
प्रथम नमन राम राया
आगमन झाले आयोध्येला
गुढी उभारुन प्रारंभ केला
राज्याची जनता स्वागताला…१
संकल्प नववर्षाचा
घेऊन येई चैत्र महिना
सुरुवात होई नववर्षास
मांगल्याची ही कामना…२
विसरून सारे द्वेष नी राग
गुढी उभारून विचारांची
सण-उत्सव सांगती गुज
शिकवण असे ऋषी मुनींची….३
संकल्प करावे जीवनात छान
सातत्याचे ठेवून भान
दिशा जीवनाची घ्यावी ठरवून
ध्येय मनाचे होईल महान…४
चंचल मन प्रभूचरणी बांधून
सुप्त गुण आपले उकलून
समाजासाठी ही वापरावे धन
सार्थक होईल मानव जीवन…५
सौ माधुरी नामदेव अमृतकार सटाणा, नासिक
Pingback: gudi padwa festival शिवगुढी - मराठी
Pingback: gudi padwa 2023 गुढीपाडवा - मराठी 1