अनुभव कवी दिलीप हिरामण पाटील
मी अनुभवलेला प्रसंग
भाग क्रं (१)
कवी.दिलीप हिरामण पाटील
पूर्वी शाळा म्हटले की खुप कडक शिक्षण असायचे शाळेतील गुरूजी हे खुपच शिस्तबद्ध कडक असत.आणि विद्यार्थी हा म्हणजे आदेशांचे पालन करणारे असायचे. शाळेत आल्या बरोबर आपापली पाटी पुस्तके वर्गात रांगेत ठेवून घंटा वाजली की प्रार्थना स्थळी जाऊन राष्ट्रगीत व श्लोक झाल्यावर रांगेंने जावून बसत. गुरूजी आल्यावर गुड मॉर्निंग म्हणत.मग तिथून चालू व्हायचे सर्व काही शिकवणे पाटीवरचा अभ्यास सांगितला तर पाटीवर करायचा पुस्तके वाचयला सांगितले तर पुस्तके वाचायची.दिवसभर शिकवून झाल्यावर गुरूजी घरी जाताना ते होमवर्क देत असत. दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यावर गुरूजी दिलेला होमवर्क तपासत असायचे.
जे जे होमवर्क करून आणायचे ते दाखवत.ज्यांनी करून नाही आणला ते मार खायायचे. पुर्वीचे गुरूजी शाळा मास्तर हे खुपच शिस्तबद्ध पद्धतीने वागायचे.आणि मुलं सुध्दा खुप घाबरत त्यांना शिक्षा तशीच ते करत म्हणून विद्यार्थी हुशार घडायचे गुरूजींना बघून आम्ही त्याकाळी लपून जात होतो.एकदाचे गुरूजी पुढे गेले की मग आम्ही रस्ता धरत असायचो.एखाद्या दिवशी जर आम्ही बाहेर दिसलो तर सकाळी आम्हाला विचारणा केली जात होती.कारे तू तिथे काय करत होता.मग थोडी फार अभ्यासात चुक झाली की मग तेव्हा ते बदडून काढत आणि ती आठवण करून देत तिथं का फिरत होता.
ऐवढी कडक ध्यान असायची.त्या काळी लावलेली शिस्त आपल्या कडून करून घेतलेला होमवर्क हे तेव्हा आपल्या कामी येत असत.मी पण तसा शाळेत हुशारच होतो. सरांच्या मुलांबरोबर मार्क मिळवत. आमच्या शाळेत नेहमी चढावढ असायची ऐकोणीसे पंच्यायशीला दहावी पास झालो.आणि पुढील मार्ग शोधयला सुरूवात केली. शाळेत असताना आम्ही व्हॉलीबॉल,फुटबॉल, हॉकी,या खेळात नेहमी सहभागी व्हायचो आणि स्टेट लेव्हल पर्यंत मी खेळलो आहे.मला यवतमाळ लातूर येथील मेडल व सन्मान पत्र सुध्दा मिळाली आहेत.मी एन.सी सी.मध्ये सी.एच.एम होतो.मला “ए” ग्रेड सर्टिफिकेट पण मिळाले आहे.
पूर्वी खेळाची सर्टिफिकेट व एन.सी. सी. ची यांची मार्क ही मिलिटरी एस आर पी पोलिस भरतीसाठी गृहीत धरली जात होती.म्हणून मी भरती साठी ट्राय करणे चालू केले होते.अस करत करत मी बर्याच ठिकाणी ट्राय केली जेव्हा मी जळगाव जिल्ह्यात भरती साठी गेलो. आणि रांगेत उभा राहिलो. सकाळ ते पाच वाजेपर्यंत माझा नंबर लागला आणि माझी फिटनेस वगैरे करण्यात आली.
आणि मला थोडीफार आशा लागली.जेव्हा माझी कागदपत्रे ही तपासन्यात आली. तेव्हा मला सांगण्यात आलं की (तुम्हारा एम्पलॉयमेंट कार्ड नही हैं इसमे तो आपको हम नहीं ले सकते हैं ) त्याकाळी कोणाला माहीत होतं की एम्प्लॉयमेंट कार्ड ही काय भानगड आहे.आणि ती भरती साठी लागतं ह्या एका कार्डामुळे मी भरती पासून दुरावलो गेलो.कारण की घरात कोणी शिकलेले नाहीत.म्हणून कोण मार्गदर्शन करणार होते. माझी ही मनातील इच्छा पूर्ण होता होता अपूर्ण राहिली. आणि परत नाही जावू शकलो. मी असाही प्रसंग अनुभवलेला आहे माझ्या जीवनात.*
क्रमशः
भाग क्रं (२)
मी अनुभवलेला प्रसंग
भाग क्रं (२)
मी अनुभवलेला प्रसंग भाग क्रं (२) पुढे चालू…. एम्प्लॉयमेंट कार्ड नसल्यामुळे माझी निराशा झाली आणि मी गावी अकरावी बारावी करून पुढील शिक्षणासाठी नरडाणा कॉलेजला F Y B A ला ॲडमिशन घेतले पण पास साठी पैसे नसायचे कुठलंही काम धंदा करून पैसे जमवून कॉलेजला जात होतो.पण कालांतरानं मला सुरत येथे जावं लागलं.
अर्धवट शिक्षण सोडून मी सुरत येथे कामा निमित्त गेलो.पण तिथलं वातावरण हे भावत नव्हते. आणि मग मी मावशी कडे बडोदा येथे गेलो व काही दिवस रिकामं रहावं लागलं आणि मला इंडियन पेट्रो केमिकल्स गॅस रिफायनरी कंपनीत काम मिळालं आणि मी कामावर जावू लागलो.असं करत करत वर्ष सहा महिने झाले.तेव्हा मला बारा रूपये रोज भेटत होता.
म्हणजे तिनसे साठ रुपये महिना मिळायचा. तेवढ्या पगारावर मावशीला द्यायचे काय घरी पाठवायचे काय स्वता: कडे किती ठेवायचे पण कसं तरी चालत होतं. तेथील कंपनीत जे साहेब होते. ते खुप दयाळू होते.त्यांना जे कुपन भेटत होती.महीन्याला तिस कुपन भेटायचे त्यांना ते मला देवून टाकायचे एक रुपयाचे एक कुपन असायचे ते माझ्या कडून पैसे पण घेत नसतं.मग त्या कुपनवर जेवून घेत असत दिवस निघून जात असायचे पण रात्र कशी काढायची हा मला प्रश्न पडायचा ज्या मावशी कडे होतो.
त्या मावशीला मुलबाळ नव्हते.पण ज्यांना मुलबाळ नसतं त्यांना दया माया अजिबात रहात नाही. त्यांना कोणाशी काही घेणंदेणं रहात नाही.कधी माझी नाईट असायची कधी दिवस पाळी रहायची रात्री मावशी अक्षरशः कोरडी पोळी आणि कोरडी चटणी बांधून देत होती डब्यावर पण काय करणार दिवस काढायचे होते.कसं तरी मी सहन करीत होतो.
इकडे घरची परिस्थिती बेताची होती.मी मोठा असल्याने जबाबदारी माझ्यावर होती. इकडे लहान बहीणीचे व लहान भावाचे लग्न करून कर्ज झाले होते. दहा रुपये शेकडा प्रमाणे आम्ही त्याकाळी पैसे वापरले आहेत.ती जास्त चिंता सतावत होती.त्यामुळे घरी काही सांगूही शकत नव्हतो.जसं होईल तसं मी दिवस कठीत होतो.बरेच दिवस झाल्यावर मी पत्र लिहिलं आई वडिलांना पत्रात मी सर्व मजकूर लिहिला की मला अशा अशा संकटातून जाव लागत आहे.
ज्या वेळेस हे पत्र गावी पोहचले आणि शेजारच्या लोकांनी वाचून दाखवलं तेव्हा माझ्या आईला अश्रू अनावर झाले.आणि संध्याकाळी वडील घरी आल्यावर सर्व हकीकत सांगितली तेव्हा माझी आई वडिलांना सांगते मना आंडोर कोलं तिखं खायी पण मना जोळे पाहिजे लगेच रात्रीच्या गाडीने मला घेण्यासाठी पाठवले वडिलांना बडोदा येथे आईने तिथे आल्यावर मला सांगितलें तुझी आई आजारी आहे म्हणून मी घेण्यासाठी आलो आहे.पण खरी गोष्ट त्यांनी मला सांगितली नाही.
आणि लगेच आम्ही तयारी करून निघालो गावी आल्यावर आई मला मिठी मारून अशरक्षा हंबरडा फोडून रडत होती.मला म्हणाली पोरा मी तुला आता कुठेच जाऊ देणार नाही.आपली आपली अर्धी भाकर खायायची आणि घरीच रहायची अशी असते आईची माया आणि कोमल मन मुलाचं दु:खं हे कधीच आईला सहन होत नाही.असाही मी कठीण प्रसंग अनुभवलेला आहे माझ्या जीवनात. वास्तव प्रसंग
भाग क्रं (३)
मी अनुभवलेला प्रसंग
भाग क्रं (३)
मी अनुभवलेला प्रसंग भाग क्रं (३) पुढे चालू मी बडोदा येथून परत घरी आलो आणि तेथून मग आपल्या उद्योगाला लागलो. शेतीच्या कामात जानं ज्वारी बाजरी कापणे परत वेळ भेटल्यावर बॅंड वाजविणे असे माझे उद्योग चालू झाले. तसेच मला तर सवय होतीच ती लहान पणा पासून बॅंड पथकात जाण्याची सगेसोयरे आपल्याला नाव ठेवतील यांच्या कडे मी लक्ष दिलं नाही.
कारण आपल्याला माहीत आहे.टाईमावर कोणीच काम पडत नाही ज्याचं त्याचं ओझं हे त्यालाच उचलावं लागतं. गाडी मस्त सुरळीत चालू होती.कालांतरांने काही दिवसांनी माझ्या आईचं वडीलाचं भांडण झालं आणि वडील घरातून निघून गेले.खुप शोधा शोध केली परंतु तपास लागला नाही.इकडे तिकडे सगेसोयरे मित्रपरिवार नातेवाईक सर्वांना विचारून झालं.
तपास कुठे लागला नाही.सर्व घरातील वातावरण बिघडून गेलं.वर्ष दोन वर्षे झाली.तरीही कुठे थांग पता लागेना.अशी करत करत दहा वर्षे झाली.तरी पण कुठेच तपास नाही.शेवटी सर्वांच म्हणं एकच जे झालं ते जावू द्या आम्ही लागलो कामाला.मग विषय निघाला माझा लग्नाचा इकडे तिकडे पोरी पाहनं चालू झालं आणि समंध जमला माझा साखरपुडा वगैरे सर्व व्यवस्थित पार पडला.
लग्नाची तारीख पक्की झाली.पण वडील नाहीत म्हणून नाराजी व्हतीच. पाच मार्च एकोणाविसे शाहण्वं रोजी लग्न झालं पण लग्नात अक्षदा टाकायला सुध्दा वडील नाहीत.कसं तरी वाटत होतं.सर्वांनी समजूत काढली लग्न लागलं.जो तो ज्यांच्या त्यांच्या घरी परतले.
सर्व ठीक झालं.संसाराच गाडा चालू झालं. आणि थोडं फार कर्ज झालं.कर्जवाले धीर मारत नव्हते.लग्न झालं म्हणजे कर्ज तर व्हायचंच.मी विचारात पडलो आता करायचं तरी काय आमच्या गल्लीतील एक मिलिटरी रिटायर झालेले मगन भामरे सैनिक होते.त्यांनी सांगितले की वर्षी दभासी येथे सिक्युरिटी गार्ड साठी दहावी पास मुले टोलनाक्यावर भरती करत आहेत.मी ही गेलो योगायोगाने मी माझ्या गावातील पाच सहा जण भरती झालो.आम्हाला ड्युटी देण्यात आली.मस्त पैकी तिथेच राहू लागलो.पण मी रात्र पाळी घेतली.
कारण सकाळी उठून मी बॅड वाजायला जात असतं अशी आमची दिनचर्या चालू होती.आणि मग माझी बदली ही अमरिशभाई यांच्या बंगल्यावर करण्यात आली.मी तिथे गेलो आणि दोन तीन महिने झाले.नेमकं संजय दत्त याला टाडा न्यायालयाने त्यावेळी सोडलं.संजयदत्त बालाजी मंदिर शिरपूर येथे येणार म्हणून आमचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला.
कारण अमरीसभाई हे क्रॉग्रेंस पार्टीचे होते तर भूपेशभाई हे शिवसेनेचं खंबीर नेतृत्व करणारे सक्रिय नेते होते.म्हणून संजयदत्त ची सुटका त्यावेळी झाली होती. मी दिड वर्ष तिथे नोकरी केली.आणि कंपनीचे इन्चार्ज यांना सांगून मी तिथून सरवड येथील स्वजस इनफुड कंपनीत बदली करून घेतली व मस्त मी कापडणे ते सरवड ड्युटी करू लागलो.पण लग्नाचे जे कर्ज राहिले होते. ज्यांच्या कडून घेतलं होते तो काही धीर काढतच नव्हता.धड इकडे चित्त लागेना धड तिकडे चित लागेना.मी पूर्ण वैतागून गेलो होतो.
आता काय करावे काही सुचेना मी आईला भावला बाईला सर्वांना सांगितले. आपण आपलं राहतं घर हे विकून टाकू आणि ज्यांचे पैसे हायेत ते देवून टाकू आम्ही एक दिवस ठरवला आणि बैठक बसवली घराचा सौदा साठी बैठक तर बसलीच पण सौदा व्यस्थित ठरत नव्हता.पण कसं असतं काही वेळेस देवच कोणाला तरी मदतीला पाठवत असतो.नेमकं तेच कारण झालं आमच्या गल्लीतील जे मिलिटरी रिटायरमेंट मगन भामरे म्हणून जे होते.त्यांनी बोलवून घेतलं आणि मला सल्ला दिला.अरे बापू तू हे काय करतो आहेस.
तू आज हे घर विकून टाकशील आणि कुठे तू रहाशील मग त्यांनी मला सांगितले दोन वर्षे कर्ज हे उशीरा फेड पण घर हे विकू नकोस मी हे त्यांचे बोलणे मनावर घेतले आणि बसलेली बैठक उठवली मला घर विकायचे नाही.तेव्हा मी हे सर्व थांबवलं आणि चिकाटीने कामास लागलो.खरंच दोन वर्षांनी ते कर्ज परत फेड केलं.आज त्याच घराला पक्क बांधून रहात आहे.असाही कठीण प्रसंग मी अनुभवलेला आहे माझ्या जीवनात वास्तव.
दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मो.नं.९६७३३८९८७