डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती dr br ambedkar
प्रासंगिक/दिनविशेष १४एप्रिल -डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती “मेक इन इंडिया ‘त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान“
दिनविशेष निमित्ताने महापुरुषांच्या जयंती सोहळ्याचे स्वरूप, जाणीवा,व प्रग्लभतेच्या पडद्याआड नकोसे बदलत चालले आहे.स्पर्धेच्या चढाओढीत मूळ उद्देशालाच बगल दिली जात आहे.
डिजे, ढोलताशे, आतषबाजीत काढली जाणारी भंपक मिरवणूक जोडीला सामाजिक अभिनिवेशाचे अक्राळविक्राळ स्वरूप, शक्तिप्रदर्शन असे जयंती उत्सव साजरे केले जातात हा महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीचा मेगा इव्हेंट लोकवर्गणीतून होतो? लोकशाहीत राजा मतपेटीतून जन्माला येतं असतो, मतांच्या मोबदल्यात मिळणाऱ्या आर्थिक पाठबळ दिल्याने होतो का?
स्थानिक लोकप्रतिनिधी आपापली मतपेटी शाबूत राखण्यासाठी ही रसद पुरवत असतात हे उघड झाले आहे, त्यांना युगपुरूषांच्या विचार धारेशी देणेघेणे नसते तद्वतच कुणा एका विशिष्ट समाजाप्रती पुळका तर मुळीच नसतो उलटपक्षी त्यांचे पुळकाधारी पाईक संपूर्ण समाज वेठीस धरतात.
समाजप्रबोधनाच्या अनुषंगाने आयोजित बौध्दीक, प्रेरणादायी उपक्रम आयोजकाला सामाजिक बांधिलकी जपत उभरत्या तरूणाईच्या अपेक्षा व अंकुर त्या नेतृत्वाच्या मर्यादेत राहूनच हे सर्व सोहळे साजरे होत असतात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वैचारिक अभ्युदय, सामाजिक गरज, समाजप्रबोधन हे मूळ उद्देशच आजच्या जयंती उत्सवातून पुसले जाताहेत ,मग ती शिवराय, फुले, शाहू आंबेडकर,संत गाडगेबाबा कुणाही महापुरुषांची जयंती असेल.
यावर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवादरम्यान लोकसभेची निवडणूक दरवाजावर आली आहे
बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण, लोकशाही अबाधित ठेवणे, तसेच सामाजिक न्यायाची गॅरंटी धोक्यात आली आहे हे प्रमुख मुद्दे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात विरोधकांच्या अजेंड्यावर अग्रभागी आहेत.
धार्मिक अभिनिवेशाचा विषारी प्याला मतदारांच्या ओठावर ठेवून सत्ता हस्तगत करण्याचा होता हे याची भीती सत्ता बाहेरच्या समुदायाला सतावते आहे हे नेमके बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव काळात समोर येत आहे,हा नक्कीच सामाजिक लोकशाही विघटनाचा काळ आहे का?हा प्रश्न सामान्य नागरिकांना भेडसावत आहे तरीही नागरिकांनी मतदानाचे पवित्र कर्तव्य निर्मोही, निर्भेळ व निर्भीड बाण्याने लोकशाही टिकविण्यासाठी पार पाडायला हवे स्वातंत्र्योत्तर काळात सनातन विचारधारा असलेल्यांनी जाणीवपूर्वक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांचे कैवारी म्हणून प्रोजेक्ट केले, वास्तविक स्वातंत्र्य,समता, बंधुता, बंधुत्ववादी लोकशाही प्रणालीचे बीजारोपण राज्य घटनेत करून बाबासाहेबांनी जनतेचे राज्य निर्माण केले आहे.
राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण होण्याचे त्यांचं स्वप्न साकार झाले नाही. मंडल आयोग लागू झाल्यानंतर जातिपातीच्या जाणीवा अधिक गडद होत गेल्या, सामाजिक विघटन जातींवर आधारित झपाट्याने होताहे सामाजिक लोकशाही निर्माण करण्याऐवजी सत्तापिपासू राजकीय नेत्यांनी सामाजिक ऐक्याची दिशा व दशा बदलून टाकली, आरक्षणाचा मूळ गाभाच राजकीय सत्ता लालसेपोटी लूप्त होत चालला आहे सोलापूर, अमरावती सारख्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना जातपडताळणी समितीने अवैध सिद्ध करूनही पुर्ण टर्म खासदारकी रद्द होत नाही व पुन्हा उमेदवारी मिळते हे ह्याचेच द्योतक आहे.
मागेल त्याला आरक्षण ही वृत्ती सामाजिक मागासलेल्या वर्गातील आरक्षणाला गिळंकृत करायला निघाली आहे.केंद्रीय स्तरावर मागासवर्गीय योजनांचा पाच कोटी निधी गोठवून हेच अधोरेखित केले आहे
भारतात कितीही जाती,धर्म,पंथ,समुदाय असले तरी सर्वांनी मिळून मिसळून एक संघ रहावे ह्या मानवतावादी विचार धारेची कसदार पेरणी संविधानात करून “मी प्रथमतः व अंतिमतः भारतीय आहे” ही भारतीय तत्वांची मांडणी बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम केली त्याच युगप्रवर्तक महामानवाला एका विशिष्ट समाजापत बंदिस्त केले गेले.
त्यांनी अखिल भारतीय समाजाच्या उत्कर्षासाठी, उन्नतीसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे मेक इन इंडिया ‘त बाबासाहेबांचे स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे.
औद्योगिक प्रगतीसाठी आवीज, पाणी या मूलभूत सुविधांची मुहूर्तमेढ आंबेडकर यांनी १९४२मध्ये रोवली ‘जल ही मानवी संपत्ती आहे ही संकल्पना सर्वप्रथम बाबासाहेबांनी भारतात रूजवली, १९४४मध्ये दामोदर नदी खोरे बहुउद्देशीय परिषदेचे अध्यक्ष असताना मध्यवर्ती जलमार्ग, जलसिंचन, नौका नय आयोगाची स्थापना केली हा आयोग केंद्रीय जल आयोग आणि ऊर्जा प्राधिकरण नावाने कार्यरत आहे.
स्त्रीयांच्या उन्नती व मुक्तीसाठी लढणारे योद्धा म्हणून खर्याअर्थी ते महिलांचे कैवारी होते.हिंदुकोड बिलांच्या माध्यमातून पोटगी, पुनर्विवाह, घटस्फोट, दत्तक विधान, वडिलांच्या मालमत्तेत समानअधिकार, महिला म्हणून सद्यस्थितीत आज ज्या सवलती दिल्या जातात त्याचे श्रेय बाबासाहेबांना जाते, ह्या अर्थाने ते स्री मुक्ती लढ्याचे जनक होते.
शेतकरी, कष्टकरी मंजूर,कामागारानसाठी विमा सेवा शाश्वती,रजा,आठ तास काम, वैद्यकीय सुविधा, सेवानिवृत्त पे़शन आदी सुविधा उपलब्ध करून श्रमप्रतिष्ठेतेला एक संवैधानिक मूल्य प्राप्त करून दिले आहे कामगार कल्याण केंद्र हा एक त्याचाच भाग गणता येईल.
भारतीय जनतेच्या उत्थानासाठी राज्य घटना लिहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन,गिरीजा, गरीब श्रीमंत, स्री पुरुष अबालवृद्ध सर्व जनजाती, आदी सर्वच घटकांवर अनंत उपकार करून ठेवले आहेत भारतीय सामाजिक न्यायाचे खरेखुरे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांना जयंती दिनी मानाचा मुजरा विनम्र अभिवादन.
विद्रोही कवी, साहेबराव मोरे,. चाळीसगाव
मो ९४०४०४८६०१
Pingback: संविधान - मराठी
Pingback: bhim geet भीम गीत - मराठी
Pingback: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य - मराठी