रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज
“रयतेचा राजा”
रयतेनेच केलेला
रयतेचा मीच राजा
रयतेसाठी झालेला
माझा नाही गाजावाजा //१//
रयतेसाठीच खुला
केला,माझा दरवाजा
रयतच म्हणे मला
रयतेचा महाराजा //२//
समजतो स्वयं मला
सेवकच रयतेचा
खजिनाच केला खुला
विचार जनहिताचा //३//
सदा मनात चिंतन
केले मीही रयतेचे
विचारांचे ते मंथन
झाले राज्याच्या हिताचे //४//
राज्याधिकाऱ्यांनी सदा
रयतेचे पहावे हित
सर्व रयतेने सुद्धा
गावे,सुराज्याचे गीत //५//
सुराज्यातून स्वराज्य
जन्मसिद्ध हक्क व्हावा
स्वयं स्वार्थ व्हावा त्याज्य
आदर्श सर्वांनी घ्यावा //६//
(से.नि.प्रा.प्रकाश बिरारी.खमताणे,सटाणा)
(मोबाईल नं.- 9403307521)
![Chhatrapati Shahu maharaj](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/06/img-20240626-wa00366511551890846222895.jpg)