छावा Chhaava
Chhaava Chhatrapati Sambhaji Maharaj
काय लिहू अन कसं लिहू ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला आलेला “छावा” … शंभू राजे .. छत्रपती संभाजी महाराज …
चार तास झाला थिएटर मधुन बाहेर पडुन .. पण श्वास अजून घशात च कोंडल्यासारखा जाणवतोय …
लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला “छावा” .. शिवाजी सावंत यांच्या कादंबरीत पाहिलेला छावा अन आज लक्ष्मण उटेकर यांच्या चित्रपटातील अनुभवलेला छावा …
शेवटची २० मिनिटं …
डोळ्याची पापणी चीही उघडझाप करु नये अशी…
खिळवुन ठेवणारी ..
काय सहन केलं असेल आपल्या शंभू राजांनी ….
कसं सहन केलं असेल?
धर्माबद्दल .. स्वराज्या बद्दल काय प्रेम असेल …
नुसता तव्याचा चटका बसल्यावर बाऊ करणारे आपण …
अन हा आपला शंभू राजा ..
कसा घडला असेल ..
कसा घडवला गेला असेल ?

शेवटची १५ मिनिटं डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं..
पुर्ण थिएटर मधे पिन ड्रॉप सायलेन्स होता ..
भिती याचीच होती घशाकडे अडवून ठेवलेला हुंदका बाहेर फुटेल …
अभिमान वाटला मराठा असल्याचा ..
अभिमान वाटला अशा आपल्या छत्रपतींचा..
आपल्या राजांचा..
छत्रपती शिवाजी महाराज अन शंभू राजे नसते तर काय झालं असतं आपलं .. नक्की कोणत्या परिस्थितीत असतो हा विचार ही करावा वाटत नाही…
लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात शंभू राजांचे झालेले हाल वाचलेले .. ते फक्त डोक्यात होतं ..
पण आज हृदयाला भिडलं.. नसानसात भिणलं.. पुर्ण शरीरभर रक्तात उसळलं.. अन मेंदुला झिणझिण्या आल्या … असं वाटलं थिएटर मधेच पडद्या वरच्या त्या औरंग्यावर तुटुन पडावं .. कापुन काढावं…
विकी कौशल हा एक गुणी अभिनेता च आहे .. पण हा मुव्ही बघून मी त्याचा फॅन झालो … जबरदस्त जबरदस्त अभिनय …
जीव ओतलाय अक्षरश: अभिनयात …
अन औरंगझेब … अक्षय खन्ना … तोडीस तोड उतरलाय … खरं च रागाने दगड मारावेत असा अभिनय..
रश्मिका चा ही जन्म ही आपल्या महाराणी येसुबाई करुन धन्य झाला …
फक्त श्रीवल्ली चं श्रीसखी का केलंय कळलं नाही.. पण असो ..
चांगली वठवलीये महाराणी येसुबाई ..
इतर सर्वांचे अभिनय सुंदर ..
नेहमीप्रमाणे च दिव्या दत्ता ने छोट्याशा च रोल मधली सोयराबाई करताना त्यात जान ओतलीये ..
चित्रपट नक्की बघा …
आपल्या राजाचा चित्रपट आहे.. आपला चित्रपट आहे..
मुलांना दाखवा .. त्याना सांगा की हे सर्व खरं घडलंय ..
शंभू राजांनी हे सर्व एवढं सहन केलंय …
एवढे पराक्रम केलेत..
नुसती दाढी अन मिशी वाढवली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अन छत्रपती संभाजी महाराज बनता नाही येत..
त्यासाठी रक्तात स्वराज्य असलं पाहिजे..
रक्तातच छत्रपती शिवाजी महाराज अन शंभू राजे असले पाहिजेत..
तसे गुण.. तसा पराक्रम .. तशी सहनशक्ती.. अन स्वराज्या बद्दल तसं प्रेम असलं पाहिजे..
चित्रपट संपल्यावर एक गोष्ट करायची राहून गेली अन तीच गोष्ट मनाला चटका लावून गेली.. आत्ताही लावतेय….. कारण त्यावेळी घशाकडे हुंदका दाटलेला होता… शब्द बाहेर फुटलेच नसले..
जोरात ओरडायचं होतं..
म्हणायचं होतं..
छत्रपती संभाजी महाराज की …. जय…
छत्रपती शिवाजी महाराज की … जय…
जय भवानी