बस्तर द नक्सल स्टोरी Bastar The Naxal Story
Bastar The Naxal Story बस्तर द नक्सल स्टोरी
‘द केरळा स्टोरी’ सारखा दर्जेदार आणि संवेदनशील चित्रपट देणाऱ्या, निर्माता विपुल शाह, दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा या प्रतिभावान टीमने भारताला भेडसावणाऱ्या एका भयावह प्रश्नावर तितकाच प्रभावी, मर्मभेदी आणि मुळापासून हादरवून टाकणारा चित्रपट दिला आहे.
बस्तर द नक्सल स्टोरी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
‘या चित्रपटातील घटना वास्तवावर आधारित असल्या तरी त्या काल्पनिक आहेत’, असं सुरुवातीला जाहीर केलेलं असलं तरी.यातील प्रत्येक घटना प्रत्यक्षात घडलेली आहे. केवळ भारताचा तिरंगा फडकवला म्हणून आदिवासींच्या शरीराचे बत्तीस तुकडे खरंच करण्यात आले आहेत.
![Bastar The Naxal Story](https://m.media-amazon.com/images/M/MV5BM2NkYzU5ZjYtM2U1My00MTFjLTkzZGYtODM3MzQyM2RjNjQzXkEyXkFqcGdeQXVyOTI3MzI4MzA@._V1_.jpg)
सलवा जुडूमचा संस्थापक महेंद्र कर्मा ( चित्रपटातलं नाव राजेंद्र कर्मा ) याची निर्घृण हत्या केल्यानंतर, गोळ्यांनी चाळणी झालेल्या त्याच्या देहाभोवती फेर धरून नक्षलवाद्यांनी खरंच नाच केला आहे.
नक्षल्यांनी सीआरपीएफच्या 73 जवानांची हत्या केल्यानंतर जेएनयुमधील डाव्यांनी व गौतम नवलाखासारख्या अर्बन नक्षल्सनी खरंच आनंद साजरा केला आहे.
हा चित्रपट बस्तरमधील मातांना समर्पित
नक्षलवादाचं उच्चाटन करण्यासाठी देशभक्त पोलीस अधिकाऱ्यांनी आपलं सर्वस्व खरंच पणाला लावलं आहे… आपल्या मुलांनी या अंधःकारात हरवून न जाता शिकून प्रगती करावी यासाठी बस्तरमधील मातांची खरोखरच तगमग झाली आहे.म्हणून तर हा चित्रपट बस्तरमधील मातांना समर्पित करण्यात आला आहे.
चित्रपटातील हिंसा हादरवून टाकते
चित्रपटांमधील अतिरेकी हिंसा बघून कोडगे बनलेल्या प्रेक्षकांनाही या चित्रपटातील हिंसा हादरवून टाकते. कारण या हिंसेमागे, मानवी सभ्यतेचा संपूर्ण विध्वंस करणं हेच उद्दिष्ट असलेलं एक विकृत, सैतानवादी तत्वज्ञान आहे. म्हणूनच, एखाद्या विशिष्ट प्रसंगात भावनातिरेकातून घडणाऱ्या हिंसेपेक्षाही, हिसेचं आकर्षक तत्वज्ञान बनवून थंड डोक्याने,सत्कृत्याचा मुलामा देऊन केलेली हिंसा अधिक अस्वस्थ करते.
जंगलात हिंसा आणि रक्तपात यांचं थैमान घालणाऱ्या टोळ्यांमागे उभ्या असलेल्या अर्बन नक्षल्सच्या संतापजनक कारवायांचं अत्यंत प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. नक्षलवाद्यांना आर्थिक आणि कायदेशीर मदत करणं, त्यांच्याभोवती नैतिकतेचं खोटं वलय उभं करणं, लोकशाहीने दिलेल्या सर्व आयुधांचा वापर लोकशाहीचा विध्वंस हेच ध्येय असलेल्या नक्षलवाद्यांसाठी करणं.अशी सगळी कृत्य ही मंडळी किती साळसूदपणे करतात हे बघण्यासारखं आहे.
डाव्या वाळवी’ च्या कार्यपद्धतीवर भेदक प्रकाश टाकणारं चित्रपट
‘तोडो भारत’ या ध्येयासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या अतिश्रीमंत ‘डीप स्टेट’, जिहादी गट, वोक इकोसिस्टीम यांच्या कारवायांचं सुसूत्रीकरण करून, नक्षलवादाचं संरक्षण आणि प्रसार कसा केला जातो हे पाहून डोकं भणभणायला लागतं. “जबतक दीमक की तरह सिस्टिम में घुसकर इसे खोखला नहीं बनाओगे, इसे तोड नहीं पाओगे ” हे या चित्रपटातलं वाक्य डाव्या वाळवी’ च्या कार्यपद्धतीवर भेदक प्रकाश टाकणारं आहे.
शहरी नक्षलवाद्यांचा चेहरा ओळखण्यासाठी हा चित्रपट बघावा
हे सगळं ‘गरीब बिचार्या’ आदिवासीं साठी सुरू असल्याचा कितीही आव आणला तरी आदिवासींचं आयुष्य सुसह्य व्हावं, त्यांची प्रगती व्हावी यासाठी करण्यात येणाऱ्या रस्ते, शाळा यासारख्या सुधारणा होऊ नयेत आणि आदिवासी सतत आपल्या दहशतीखाली रहावेत असेच प्रयत्न नक्षलवादी करतात. कारण त्यांचं उद्दिष्ट ‘आदिवासींचे भलं’ हे नव्हे तर ‘हिंसा आणि विध्वंस’ हेच असतं. हे वास्तवदेखील हा चित्रपट बघताना प्रकर्षाने जाणवतं.
तुमची राजकीय वा सामाजिक मते काहीही असोत. भारतीय लोकशाही आणि प्रजासत्ताक यांचा विध्वंस करण्यासाठी, भारताचे तुकडे करण्यासाठी फॅनॅटिक होऊन हिंसेचं थैमान घालणाऱ्या नक्षलवाद्यांचा आणि आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या त्यांच्या शहरी सहकार्यांचा चेहरा ओळखण्यासाठी हा चित्रपट बघायलाच हवा.
Pingback: स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट - मराठी 1