वारुळ
वारुळ
कण कण मृत्तिकेचा
आली घेऊन केवळ
पहा इवल्या मुंगीने
कसे बांधले वारुळ॥धृ॥
कसे कोठून आणले
हिने इतुके हे बळ
नाही थांबत जराही
कुठे एकही न पळ॥१॥
एकी हेच असे बळ
हिने जाणिले प्रबळ
एक झाल्या सार्याजणी
आणि बांधले वारुळ॥२॥
आला कोठून नागोबा
तिथे ठोकण्यास तळ
जात सापाची ठाऊक
सदा ओकते गरळ॥३॥
नादी त्याच्या न लागता
पुन्हा बांधती वारुळ
पहा चालल्या रांगेने
जसे रेलवेचे रुळ॥४॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
![वारुळ](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/08/fb_img_17242151399161818332472076797718.jpg)