आई वडील शिवाय
‘आई बाबांशिवाय’
संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसूमाई)
रोज सकाळी आई बाबांची
कामावर जाण्याची लगबग असते
पण माझी विचारपूस करायला
त्यांच्याकडे वेळ नसते
मोलकरीण सोबत मी शाळेत जातो
तिचं मला घ्यायला येत असते
पण बोट धरून घरी यायला
आई मात्र सोबत नसते
बाबांजवळ खाऊचा हट्ट असतो
ते टाळाटाळ करत असतात
बागेमध्ये एकटाच खेळतो
पण बाबा जवळ नसतात
आई बाबा असतांनाही
कोणीही बोलत नाही
मिच फक्त बडबड करतो
पण माझं कोणी ऐकत नाही
दिवसभर दोघे बाहेरचं असतात
माझी आठवण मात्र येत नसते
आई बाबांशिवाय झोपून जातो
पण मायेची उब मिळत नसते
दारात बसून वाट बघायची तर
घरी कोणी लवकर येत नसतं
सुटीच्या दिवशी घरीच असतात
पण मिठीत कोणी घेत नसतं
बोलू कुणाशी कळेना काही
घर असूनही घरपण नाही
घरात सगळेच असतात हो पण
डोक्यावरून हात कोणी फिरवत नाही
आईचा पदर धरल्या शिवाय
लेकराला चालता येत का
बाबांच्या आधाराशिवाय
पोरगं मोठं होत का
पण…….
आई बाबांशिवाय जगणं माझं
प्रेम कोणाकडून मागायचं
चार भिंतींच्या घरामध्ये
सांगा बरं एकट्याने कसं रहायचं
संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसूमाई)