मराठी कविता संग्रह

मराठी कविता संग्रह

मराठी कविता संग्रह

स रे सशाचा अरे

‘स’ रे सशाचा
अरे

ससा रे ससुल्या
चांदी सारखा चांदुला
आभाळीच्या चांदोबाचा
         अरे लाडोबा लाडुला॥धृ॥
अंगा खांद्यावर सदा
त्याने तुला मिरवला
‘स’ रे म्हणता सशाचा
           कित्ता मी ही गिरवला॥१॥
बघ फिरुन हा हात
‘स’ रे सशाचा फिरला
जरा लागता चाहूल
                   पण कुठे हरवला॥२॥
मला वाटले उगीच
घ्यावे तुला खेळायला
दोस्ती करण्या आधीच
                दूर लागे पळायला॥३॥
असा कसा खेळगडी
चांदोबाला आवडला
तसा मला ही भावला
             पण हाती नाही आला॥४॥
       निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३
[बालगीतोत्सव ह्या माझ्या स्व रचित प्रकाशित कविता संग्रहा मधून सुप्रसिद्ध सिने गीतकार प्रा. प्रवीणजी दवणे यांची प्रस्तावना आहे ह्या कविता संग्रहाला…]

बोल बाहुली बोलना

       बोल बाहुली बोलना
रोज तोच तो तुझा ग
फ्राॅक बाहुली ग जुना
कधी सांगशिल सांग
         मला नवा फ्रॉक आणा॥धृ॥
नव्या फ्राॅकला मॅचिंग
नव्या बांगड्याही आणा
येते जुन्यातही हसू
        कसे तुझिया ओठांना॥१॥
असे कोणते गुपित
तुझे ऐकू दे कानांना
बघ जरा उकलून
       तुझ्या अबोल बोलांना॥२॥
एका जागीच बसते
माझ्या परी का धावेना
तरी ओठांवर खुशी
         तुझ्या कशी ग मावेना॥३॥
बोल बाहुली बोल ना
काय गुपित खोल ना
काय ओठात दडलं
          कधी बोलशी बोलना॥४॥
       निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

पण नकोच दादा भांडू

         पण नकोच दादा भांडू
भातुकली चा खेळ दादा
माझा मलाच देरे मांडू
भातुकलीच्या खेळामधे
         असा नकोच दादा भांडू॥धृ॥
डाळ भात भाजी पोळी
जारे नकोच माझी सांडू
तुझा तूच कां न खेळशी
           खेळ विटी आणिक दांडू॥१॥
गुळ आणि मिळून दाणे
बघ छान किती हे लाडू
नकळत माझ्या हळूच
            बाबा नकोच सारे काढू॥२॥
वाट पाहे पहा तुझी रे
बघ तो बॅट आणि चेंडू
बोलावती पहा मित्र ही
              चंदू  नंदू आणिक बंडू॥३॥
झाली वेळ ही रांधायाची
बघ पुन्हा मला दे रांधू
भातुकलीच्या खेळामध्ये
               पण नकोच दादा भांडू॥४॥
       निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

मराठी कविता संग्रह
मराठी कविता संग्रह

पण बोल ग बाहुले

        पण बोल ग बाहुले
एका जागीच बाहुले
तुला कसे करमते
एक कोपरा तुझा ग
         मन कसे ग रमते॥धृ॥
कुणी बोलो अथवा न
तरी सारे समजते
सदा एकटी हसते
         कसे तुला ग जमते॥१॥
सांग एकटी असता
कुठे स्वप्नात रमते
परी राज्यात परी च्या
        काय खेळात रमते॥२॥
जादुगाराच्या जादुयी
नगरीत का रमते
राज कन्येच्या कोणत्या
          महालात हरवते॥३॥
सांग गमती जमती
मला सारे ते भावते
पण बोल ग बाहुले
        मला सारे ऐकव ते॥४॥
    निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,  प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

मराठी कविता संग्रह

यान गेले सुर्यावरी

यान गेले सुर्यावरी
पूर्णब्रम्ह म्हणतात
जन अन्नाला हो सारी
घास जातोच श्राध्दाचा
          तरी अग्नीच्या आहारी॥धृ॥
मला वाटते म्हणून
नाव घासाचे आगारी
कष्ट बळीचे जाळून
             खाक करतात सारी॥१॥
घरा घरातून घास
जळतात कितीतरी
महागाई महागली
               तरी विचार ना करी॥२॥
भाव वाढता धान्याचे
पण बोलतात सारी
अरे माणसा तुझिया
            तूच मनास विचारी॥३॥
कधी होळीत जाळशी
कधी टाकशी आगारी
बळी रुढींचे होणार
       सांग किती काळ सारी॥४॥
येता अक्षय तृतिया
रस पोळीची आगारी
सण येता संक्रातीचा
        अन्न आगीच्या आहारी॥५॥
अरे माणसा व्हायला
हवे जागे आतातरी
सोड आता अंधश्रध्दा
             यान गेले सुर्यावरी॥६॥
     निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शबसृष्टी,  प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक :-९३७१९०२३०३.

मराठी कविता संग्रह

बात सांगते लाखाची

बात सांगते लाखाची
सत्यावर असत्य हे
आले करितच मात
त्यात केला शपथेने
पहा आणखी आघात॥धृ॥
शपथेने सत्यतेचा
केला पुरताच घात
वेश सत्याचा घेऊन
खोटे मिरते जगात॥१॥
खरे रहाते केवळ
रडगाणे गात गात
सत्यतेच्या संघर्षाची
अशी होते वाताहात॥२॥
सत्य सत्याचे पटेना
कधी जनमानसात
एक दिवस सत्याचा
पण येतो प्रकाशात॥३॥
मग रहावे लागते
असत्याला भर्कटत
खोलवर कोसळते
अंधाराच्या गर्ततेत॥४॥
गती तून अधोगती
खोटे असते साधत
सोडा म्हणून जन हो
अशी खोट्याची आदत॥५॥
सदा लाभते खोट्याची
अशी अपुरीच साथ
एक लाखाची सांगते
पहा मंगला ही बात॥६॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.


2 Comments

  1. Ka.ra.chavan

    चारोळ्या व बोलकी चित्रंअप्रतीम!दिनेशजी.

  2. Vijaya d.bhange

    बाल गीते उत्कृष्ट आणि मधे मधे लिहिलेल्या चारोळ्या पण खूपच सुंदर…..आपल्या लिखाणास शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *