भीम गीत bhim geet
भीम गीत
बाबांची हि भीम गर्जना
आहे किती थोर
या धर्तीवर्ती झाला
असा एकचं घटनाकार ||धु||
शाहु फुलें आंबेडकरांनी
केली भुमी पावन
करूया त्यांना सारे मानवंदन
क्रांती ज्योती मशाल घेऊ सारे खांद्यावर
या धर्तीवर्ती झाला
असा एकच घटनाकार
तप त्याग तपश्चर्येचे मुर्ती आहे संत
बाबासाहेब आंबेडकर देशाचा ग्रंथ
बुध्दंम शरणमं गच्छांमीचा
संदेश देऊ जगभर
या धर्तीवर्ती झाला
असा एकच घटनाकार
बाबांच्या आठवणींचा होतो भीम मेळा
धम्मदिप विचारांचा होतो दिव्य सोहळा
बाबांच्या चरणी नत् झाला
निळा जनसागर
या धर्तीवर्ती झाला
असा एकच घटनाकार
चौदा एप्रिल आहे भारत माता
भीमरायांचे कार्य दिलीतांची गाथा
चैत्यभूमीवर रणांगणावर झाला भीमाचा जयजयकार
या धर्तीवर्ती झाला
असा एकच घटनाकार
संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)
९४२२८९२६१८
९५७९११३५४७