संविधान वरदान
खरे मानव हिताचे
सारे लिखित विधान
नाव जाहले अमर
जीवनात संविधान॥धृ॥
जात मानव एकच
बाकी सारेच अज्ञान
धर्म खरा मानवता
महा मानवा हे ज्ञान ॥१॥
नोंद मानवी हिताची
जिथे तेच संविधान
प्रत्येकाने घ्यावे ज्ञान
संविधानी वरदान॥२॥
स्त्रीया आणखी पुरुष
दोन्ही जीवनी समान
जिथे मिळते मान्यता
नाव त्याचे संविधान॥३॥
फुले आंबेडकरांना
आली प्रथम ही जाण
दिले बाबा साहेबांनी
संविधान वरदान॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३
Posted inमराठी कविता (Marathi Kavita)