गझल माझी बोलते महात्मा ज्योतिबा फुले
गझलवृत्त :- मेनका
माझे ज्योतिबा
ज्ञानियाचे द्वार माझे ज्योतिबा
कर्मठांवर वार माझे ज्योतिबा
पुस्तकांनी मस्तकांना जोडले
अक्षरांची धार माझे ज्योतिबा
अंधश्रद्धा कर्मकांडे रोखली
शक्तिशाली पार माझे ज्योतिबा
सावकारी वादळांशी झुंजले
सागराचा क्षार माझे ज्योतिबा
विश्वव्यापी लेख त्यांचे गाजले
लेखनीचे स्वार माझे ज्योतिबा
जीवनी शिवराय दैवत मानले
कर्मयोगी फार माझे ज्योतिबा
बालिकांना ज्ञान अमृत पाजले
शब्दपुष्पी हार माझे ज्योतिबा
देव ऐैसा ‘देवदत्ता’ वंदितो
जीवनाचे सार माझे ज्योतिबा
सुंगंधानुज
नामपूर ता.बागलाण जि. नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.
चित्रसौजन्य –श्री.विश्राम बिरारी
ज्ञानमहर्षी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंती दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व ज्ञानसुर्याला त्रिवार वंदन !
Pingback: महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन - मराठी