तरी त्याचे त्या कळेना kavita marathi latest
तरी त्याचे त्या कळेना
नाही घर ही बंगला
हॄदयाचा एक कोना
तुझ्या परी धनवान
तरी पाहिले न कोणा॥धृ॥
तुझ्यावरी ही बितते
पण कळते ना कोणा
खेळ कधी खेळतोस
खेळी तुझीही कळेना॥१॥
कधी मोठ्या मनाचारे
होतो इवल्याशा मना
मान तुझा मिळतो रे
कधी थोरांना मोठ्यांना॥२॥
कधी फिरताही दशा
तुला कुणी विचारीना
हवी जागृती म्हणूनी
सदा सद्-विचारांना॥३॥
शक्ती सद्-विचारांची
वाढविण्यास हवीना
कला अवगत होते
हिच समस्त कवींना ॥४॥
कवी सदा हतभागी
त्याचे भाग्य उजळेना
विश्व सारे उजळीतो
तरी त्याचे त्या कळेना ॥५॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
