पोटी एक मुलगी जरूर असावी
पोटी एक मुलगी जरूर असावी…
थोडी कच्ची थोडी पक्की पोळी करून,बाबाला घास भरवण्यासाठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी…
रोज संध्याकाळी, दमलास का रे बाबा आज असं म्हणण्यासाठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी…
लाडे लाडे बाबावर लटकेच रुसण्यासाठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी…
लगेच राग सोडून, बाबाला मिठी मारण्यासाठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी…
बाबाचे अश्रू हळूच पुसण्यासाठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी…
रडू नको ना बाबा म्हणण्या साठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी…
मुलगी असून आईची माया देण्यासाठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी…
शाळेत सोडायला तूच ये , असं बाबा जवळ हट्ट धरण्यासाठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी…
आई पेक्षा मला बाबा आवडतो, असं म्हणण्यासाठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी…
उमेदीने तिचा मुद्दा ,बाबाला पटवून देण्यासाठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी…
आई चिडल्यावर, बाबाच्या मागे लपण्यासाठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी…
बाबाला कन्या दानाचे सुख देण्यासाठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी…
सासुराला जातांना, बाबाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्यासाठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी…
पाडवा सणाला ,बाबाला भारी साडी मागण्यासाठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी…
बाबाला बरं नाही, म्हंटल्यावर धावत माहेरा येण्यासाठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी…
बाबाचे, बाबा म्हणून जगणे सार्थक करण्यासाठी …
पोटी एक मुलगी जरूर असावी
पोटी एक मुलगी जरूर असावी
