कानबाई माता उत्सव

कानबाई माता उत्सव
कानबाई माता उत्सव

कानबाई माता उत्सव

खान्देशातील कानबाई आईचा उत्सव

खान्देशातील कानबाई आईचा उत्सव  ।

खान्देश म्हटला की ‘ खानदेशचं वैभव ‘ ”खान्देशची समृद्धी ‘ खान्देशच्या  कडया कपाऱ्यातून वाहात जाणाऱ्या बोरी ‘ पांझरा ‘ अनेर ‘अरुणावती ‘ तापी अशा नद्या डोळ्या पुढे येतात . अन्न धान्याच्या राशी  पाण्याने ओथंबलेला खान्देश ‘ तलाव ‘ झरे सातपुड्यातील उंच व विशाल वृक्ष डोंगर ‘ दऱ्या फार पुर्वी पासुन प्रसिद्ध आहेत . डोंगरावरून कोसळणारे धबधबे खान्देशातील दुध ‘ तूप ‘ लोणी ‘ साऱ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध   आहे . खान्देशातील फुलबागा . असा बहरलेला खान्देश ‘ शिवाय सांस्कृतिक पारंपारिक वैशिष्ट्यांनी नटलेला खान्देश अगदी संपन्न आहे . खान्देशातील बोली भाषा अहिराणी आहे . अगदी मधाळ रसाळ भाषा ऐकायला खूप गोड व खूप आपुलकीची भाषा वाटते बरं !खान्देशातील  लोक साधे व सरळ भोळे  अन भावूक आहेत .

मरी आई ‘ मुंजोबा . आसरा ‘ रानबाई ‘ कानबाई ‘ भालदेव ‘ ही ग्रामदैवते ‘ आपलं संकटा पासून रक्षण करतात अशी पक्की भावना खान्देशातील लोकां मध्ये रूढ झालेली आहे . ग्रामीण भागात कुटीर व्यवसाय बारा बलुतेदारांचे व्यवसाय शेती ‘ गुरे पाळणे ‘ कष्ट करून राब राबणे . . .या शिवाय ग्रामीण भागात असतं तरी काय ? पण व्हायचे काय ‘ एव्हढे करूनही काही काही  वेळेला त्यांच्या पदरी काहीही पडत नव्हते . निसर्गाचा कोप ‘ दुष्काळ ‘ पिकांवर पडलेल्या रोगां मुळे लोक हैराण होत असत .

मुख्य म्हणजे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेचा अभाव शिक्षणाचा अभाव लोकां  मध्ये फारशी जनजागृती नव्हती . भूत ‘ पिशाश्च आशा विविध संकाटां पासून फक्त आपल्याला ग्राम दैवतच आपलं रक्षण करू शकतात यावर ते ठाम होते  आणि आज देखिल खान्देशात तेच चित्र बघायला मिळते . आपली काही चूक झाली असेल तरी अशी संकटे येतात .

या गावाला या संकटा पासून वाचवायचे असेल तर ग्राम देवता कोप पावली आहे . त्यांची मनोभावे पूजा केली पाहिजे . नैवेद्य द्यायला हवा तेव्हा ही संकटे दुर होतील अशी भावना दृढ झाली . जर खूप चांगला पाऊस झाला शेतकऱ्याला भरभरून धान्य मिळालं सर्वत्र आनंद झाला तर ही कृपा देवी आईचीच ही भावना ग्रामीण भागातील लोकांमध्ये रूढ झाली . देवी घरात समुद्धी आणते . .रोगराई संकटे सारी नष्ट करते . सुवासिनींची कूस ‘ आई मुळेच उजळते .

कानबाई माता उत्सव
कानबाई माता उत्सव

ही सर्व आई कानबाई ची कृपा ही भावना ग्रामीण लोकां मध्ये फार पुर्वी पासून तर आज ही चालू असल्याचे दिसून येते . मग नवस फेडण्याची कल्पना उत्सव साजरा करण्याची कल्पना पुढे आली . .. श्रावण म्हणजे सण उत्सवांचा महिना महिलांच्या व्रत वैकल्याचा महिना खान्देशात लोक संस्कृतीच्या कानबाई व रानबाई या  लोक संस्कृतीच्या देवता आहेत . मूळात कानबाईचा उत्सव हा ग्रामीण शेती संस्कृतीशी  निगडीत आहे . काही चिकित्सक मंडळी तर कानबाईचा देश म्हणजे कान्हदेश असं ही म्हणतात . आणि कान्ह चा अपभ्रंश होऊन खान्देश झाला असावा . असा तर्क काही जाणकार करतात .                                                                                                        

श्रावणात धनधान्य ‘ शेतात हिरवळ फळे ‘फुले भरपुर भाजीपाला समृद्धी भरभरून येते . झरे नद्या ओढे वाहतांना दिसतात . ही सारी कीमया आपल्या कानबाई आईचीच . . म्हणुन श्रावण या पवित्र महिन्यात शुक्ल पक्षात नाग पंचमी नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाई देवीची स्थापना करतात . घर आपलं साध सुधं जुन्या पद्धतीचं की असेना ‘त्याला शेणाने सारवलं जातं . गाईच्या गोमूत्राने सर्वत्र शिंपून त्याला पवित्र केलं जातं . कानबाई आईचा उत्सव शिस्त ‘ स्वच्छता ‘ सुंदरता व मांगल्य  व एकात्मतेचं प्रतिक आहे . निव्वळ आनंद देणारी देवता म्हणून बघीतले जाते . तिच्या स्थापनेपूर्वी हा कटाक्ष पाळला जातो . घरात योग्य ठिकाणी मग शक्यतोवर आंब्याच्या झाडाच्या लाकडा पासून बनवलेला चौरंग मध्ये आणून ठेवतात . चौरंगावर लाल वस्त्र ठेवतात .

त्याला आपण मद्रा असंही संबोधतो . त्या वस्त्रावर गहू ठेवतात . गव्हावर तांब्याचा कळस ठेवतात . त्यात सात नद्यांच जल घालतात . त्यात पाच विड्यांची पाने छान पैकी रोवतात . मग त्यावर परणून आणलेलं नारळ ठेवतात . परणून आणलेलं नारळ म्हणजे काय ते बघू या . ज्यांना नवीनच कानबाई आईची स्थापना करावयाची असेल त्यांनी एक नारळ एखाद्या जुन्या कानबाई जवळ देव्हाऱ्यात किवा जेथे पारंपारिक कानबाई असेल तेथे रात्रभर ठेवतात . दुसऱ्या दिवशी नवीन लग्न झालेलं जोडपं डांग डुबली या वाद्याच्या तालावर घरी आणून स्थापना करतात . कानबाईला फक्त पारंपारिक वाद्य चालतात . इतर कुठलेही वाद्य चालत नाही .

ही आईच्या आवडीची वाद्ये आहेत . कळसावर ठेवलेले नारळ म्हणजे आमची प्रतिकात्मक कानबाई  होय  . हवं तर त्या नारळाला आकर्षक पणे सजवले तरी चालेल ‘ नाक ‘ डोळे ‘ काढु शकतात . मग  कुंकू  लावतात . छान चमकदार मोत्यांचा हार घालतात . अंगावर रंगीत शालू टाकतात . चौरंगाच्या चार ही बाजूला केळीच्या खांबाचे लहान लहान पील बांधतात . ताडीचे फड रोवतात . कानबाईच्या पुढे श्रावणातील वनराईतील एकशे सात वनस्पतींची पाने ‘ पुजेचं साहित्य ‘ हळद कुंकु ‘ उदबत्या ‘ पूजेच्या सुपाऱ्या ‘ जुने दिवे समया ‘ व त्यात गाईचे तूप घालून ज्योत सतत तेवत ठेवावी लागते .

कानबाईला कन्हेरची फुले ‘ झेंडुची फुले आणि बिजोराचं फुल फार आवडतं . अशा रितीने कानबाई आई ची छान आकर्षक सजावट केलेली असते . गळ्यात दागिने ‘ चमकणारी माळ ‘ नाकात नथ आईचं हे तेजस्वी रूप बघून कानबाई आई पुढे नतमस्तक व्हावेसे वाटते . नदी काठनी चिक्कन माती . . . मायना साठे आनी वं माय. . . या पारंपारिक गीताच्या ओळी सुरेख गायल्या जातात . कारण नदीकाठची रेती किवा बारीक वाळू आणली जाते तिला कस्तुरी असं म्हणतात .

कानबाई आईची अगदी विधी पूर्वक स्थापना करतात . कानबाई आईला आंब्याची पानांची माळ करतात . कानबाईला वेली व वृक्षांची भारी आवड कारण शेती संस्कृतीशी निगडीत असलेला हा उत्सव मानला गेला आहे . पूजेच्या तबकात हळद कुंकु ‘ सुपाऱ्या तांदुळ कापुर ‘ शेंदूर अगरबत्ती हे आधीच आणून ठेवलेले असते . आईला हिरवा शालू ‘नाकात नथ ‘कपाळी लाल कुंकु ‘शोभून दिसत असतो . चौरंगा भोवती छान रांगोळ्या काढलेल्या असतात . खान्देशात कानबाईला पार्वती व कन्हेर शंकराचं रूप मानलं जातं . धुळे शिरपुर नंदुरबार या भागात कानबाईला पार्वतीचं रूप मानलं गेलं आहे . श्रावण महिना शंकराला प्रसन्न करण्याचा महिना व महिलांच्या व्रत वैकल्याचा महिना म्हणुन पार्वतीला साकड् घालण्याचा प्रसन्न करण्याचा हा दिवस मानला गेलाय .

कानबाईच्या बाजूला कन्हेर ला बाजुलाच टोपी घालून बसवलेलं असतं . या कानबाईच्या उत्सवाला सर्व भाऊबंद धान्याची रास पुजण्या पासून तर रोट चा प्रसाद खाण्या साठी पवित्र भावनेनं एकत्र येतात . रोट दळण्या पासून तर आईची पारंपारिक गाणी म्हणण्यात पुरुष मंडळी आपली हजेरी अगदी उत्सावाने लावीत असतात . फुगड्या ‘ नाच गाणी यात भाऊबंद एकत्र येऊन रमतात . आपला भेदभाव विसरतात . हे वैशिष्टय या कानबाईच्या उत्सवात बघायला मिळते .

आईचा प्रसाद मात्र लाह्या फुटाण्यांचा असतो . ताडीच्या फडानां देखिल लाह्या खोचून उत्सवाची शोभा वाढवतात . कानबाईचा रोट खाण्या साठी सर्व भाऊबंद एकत्र येतात . तो किती ही दूर असू देत रोट खायला येतो म्हणजे येतोच . रोट खायला मिळणं हे भाग्य समजलं जातं . रोट म्हणजे हा आईचा प्रसाद . त्यात पुरणाची पोळी ‘ खीर ‘ कटाची आमटी ‘ फुनके व भात . असा हा पवित्र रोट . जो फक्त नशीबानेच मिळतो असं समजा . पुरणाची पोळीला मांडे म्हणतात . भाताला मोगरा म्हणतात . खीर ला साखर म्हणतात .

फुनक्यांना नारळ म्हणतात . याला भोजन म्हणतात . भोजन झाल्यावर हात कुठेही धूता येत नाही ‘ त्या साठी घरात खड्डा खणला जातो त्याला समिंदर असं म्हणतात ‘ त्यातच हात धुवावे लागतात . हेतू हा हे पवित्र जल कुठेही पायदळी जावू नये हा हेतू असावा . ह्या सर्व प्राचीन रूढी आहेत प्राचीन परंपरा आहेत त्या अद्यापही सुरु आहेत हे विशेष ।                  

रात्रभर महिला कानबाई पुढे गाणी म्हणतात . ही गाणी पारंपारिक आहेत ‘ अतिशय अर्थपूर्ण गाणी असून ती कुणी लिहिली याचा कुठेच थांगपत्ता नाही . रात्रभर नाच गाणी ‘ आईच्या भक्तीत सर्व रमून जातात .पण सकाळी कानबाई आईला निरोप देण्याची वेळ येते सर्व भाव विवष होतात जड अंतकरणाने कानबाई आई चा उदोउदो जयजय कार करत नवीन जोडपं पूजा करून तो चौरंग अंगणात आणतात . तत्पूर्वी गाईच्या शेणाने ती जागा सारवली जाते ‘ सूर्या कडे तोंड करून तो चौरंग ठेवला जातो . पूजा करून दही भाताचा नैवेद्य देतात .

मग  सुवासिनीच्या डोक्यावर तो चौरंग ठेवतात . आणि डांग डुबलीच्या तालावर वाजत गाजत नदीवर गंगेवर म्हणु या .  . . विसर्जना साठी नेतात . निरोप देतांना अक्षरशः सुवासिनींचे भाविकांचे डोळे पाणावतात . “कानबाई चालनी गंगेवरी वं माय . . चालनी गंगेवरी . साखर पेरत चालनी वं माय . ”               

अशा रितीने भावपूर्ण निरोप कानबाई आईला देतात . परंतु पारंपारिक वाद्य लावूनच आईला निरोप द्यायला हवा . अशा रितीने कानबाई चा उत्सव खान्देशात फार उत्साहात साजरा केला जातो . हे जरी खरं असलं तरी प्रत्येक सण उत्सवा पासून आपण काही तरी प्रेरणा घेतली पाहिजे . जो एकतेचा संदेश ‘ आनंदाचा व भेदभाव नष्ट करण्याचा संदेश हा उत्सव देऊन जातो तो आपण निदान कायम तरी जपायला हवा म्हणजेच हा उत्सव खऱ्या अर्थाने आपण साजरा केल्या सारखं होईल . . !                                     

विश्राम बिरारी ‘ धुळे . 9552074343