मुख्याध्यापकांना सेवानिवृत्ती निमित्त कलाशिक्षकाची अनोखी भेट Sevapurti Sohala
मुख्याध्यापकांना सेवानिवृत्ती निमित्त कलाशिक्षकाची अनोखी भेट
चाळीसगाव,,,
येथील आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री, बा बा, सोनवणे सर आपल्या 32 वर्षाच्या प्रदीर्ध सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्याप्रसंगी विद्यालयाचे कलाशिक्षक ,चित्रकार कवी, साहित्यिक दिनेश चव्हाण(डी,के,) यांनी त्यांना त्यांच्या कलाकुसरने जलरंगात पोट्रेट बनवून भेट दिले. आपली जशीच्या तशी प्रतिमा बघून त्यांनी समाधान व्यक्त केले.

अतिशय दिमाखात संपन्न झालेल्या सेवानिवृत्ती समारंभास सर्वच क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते, यावेळी विद्यालयाचे चेअरमन श्री, योगेशभाऊ अग्रवाल तसेच सर्व सन्मानीय संचालक मंडळासह मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ, सुलोचना इंगळे मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ, एस, पी, पाटील मॅडम, उपमुख्याध्यापक श्री, शरद जाधव सर, पर्यवेक्षक श्री, कुमावत सर, श्री, नेरकर सर कलाशिक्षक कुऱ्हाडे सर उपस्थित होते.

साहित्यिक कवी चित्रकार दिनेश चव्हाण यांचे कलाक्षेत्रातील योगदान मोठे आहे, अनेक साहित्य संमेलनात देखील त्यांनी कवितेतून, चित्रातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अगोदर ही त्यांनी अनेक राजकीय, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांचे पोट्रेट बनवले आहेत, अनेक ठिकाणी त्यांच्या कलाकृती बघायला भेटतात, सहारा इंटरनॅशनल हॉटेलला फिल्मस्टार मंदाकिनी यांचेही त्यांनी फास्ट स्केच करून त्यांना भेट देऊन प्रभावित केले होते. शिवाय जागतिक फास्टेस्ट स्केच आर्टिस्ट म्हणून त्यांची omg बुक्स रेकॉर्डमध्ये नोंद आहे.

या अगोदरही त्यांनी आपल्या विद्यालयातील सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यास त्यांचे पोट्रेट भेट म्हणून दिलेले आहे, ही त्यांची अनोखी भेट त्यांच्यातील कलेची अनोखी भेट ठरते हे विशेष.