रिमझिम काव्य संमेलन नवोदित कवींसाठी जशी पंढरीची वारी

काव्य संमेलन
काव्य संमेलन

रिमझिम काव्य संमेलन नवोदित कवींसाठी जशी पंढरीची वारी

रिमझिम काव्य संमेलन नवोदित कवींसाठी जशी पंढरीची वारी :-

रिमझिम अहिराणी काव्य संमेलन नाशिक ,हे नवोदित कवींसाठी एक प्रकारे पंढरपूरची वारी केल्यासारखे वाटते, कारण नवोदित कवींना ,सर्वच गोष्टी जुन्या कवींसारख्या मिळत असतात. म्हणजेच जुने कवी व नवे कवी अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो.
उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ , जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद व खानदेश मराठा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येते.

रिमझिम काव्य संमेलन नवोदित कवींसाठी जशी पंढरीची वारी
रिमझिम काव्य संमेलन नवोदित कवींसाठी जशी पंढरीची वारी

आदरणीय प्राचार्य श्री. विकासजी पाटील ,अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ, तसेच आदरणीय प्राचार्य श्री. प्रशांत पाटील यांच्या वतीने , व मार्गदर्शनाखाली हे रिमझिम अहिराणी काव्य संमेलन 27 जुलै 2025 पार पडले.
ज्याप्रमाणे प्रत्येक वारकरीच्या मनात पांडुरंगाची भक्ती व दर्शन घ्यावे याचा सतत ध्यास त्यांना लागलेला असतो. तसाच ध्यास हा नवोदित कवींना एकदा आपल्याला काव्य संमेलनामध्ये काव्य सादर करण्यासाठी , व्यासपीठ मिळावे , व काव्य सादर करून , आपली प्रतिभा ही लोकांना कळावी , यासाठी हे व्यासपीठ जणू त्यांच्यासाठी पंढरीची वारी आहे.

यावर्षी ज्यांना ज्यांना साहित्यिक पुरस्कार मिळाले , त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.व एकूण ५१ कवींना त्यात बरेच नवोदित कवी होते. त्या सर्वांना जे व्यासपीठ मिळाले , त्या सर्वांचे देखील खूप खूप अभिनंदन , व पुढील वाटचालीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
यावर्षी काव्य संमेलनामध्ये काही बदल झालेला पाहण्यास मिळाला. म्हणजे वेळोवेळी अधिका अधिक नवीन नवीन संमेलनामध्ये खूपच चांगल्या गोष्टी पाहायला मिळत असतात.

काव्य संमेलन
काव्य संमेलन

१) सर्व ट्रॉफींवर प्रत्येक कवींचे नाव लिहिण्यात आले.
२) एक सर्वसाधारण व्यक्तीला देखील खरोखर त्याचे अहिराणी भाषेसाठी समर्पण असेल, अशा साहित्यकाला संमेलनाचे अध्यक्ष पद हे दिले जाते. ही बाब कवींसाठी व साहित्यिकांसाठी , सुदामा व श्रीकृष्ण यांची भेट झाल्यासारखी वाटते.
३) तसेच प्राचार्य डॉक्टर दा .गो. बोरसे पुरस्कार , हा अहिराणी भाषेचा संवर्धन करणाऱ्या अतिशय गरीब जरी कवी असला , की ज्याच्याकडे काव्य संमेलनाला हजर राहण्यासाठी खरोखर भाड्याचे पैसे सुद्धा नसतात , मात्र त्याची तळमळ जणू पंढरपूरच्या विठोबा मला एकदा तरी दर्शन व्हावे , अशी इच्छा त्याच्या मनात असते , ती खरोखर रिमझिम काव्य संमेलनात , त्याला पुरस्कार मिळाल्यामुळे पूर्ण होते. ही बाब खूपच सर्वांसाठी उल्लेखनीय आहे.

४ ) दरवर्षाप्रमाणे सर्व कवींना ज्यांनी फॉर्म भरले होते , अशा सर्वांना , फेटा बांधून सन्मानपूर्वक , आदराने त्याच्या कार्याचा गौरव करून, त्यांना व्यासपीठावर बसवून , काव्य सादर करण्याची संधी मिळाली. कुठल्याच प्रकारे भेदभाव हा दिसून आला नाही.
५) दरवर्षाप्रमाणे सर्व कार्यक्रमाचे आयोजन , नियोजन , यासाठी आदरणीय प्राचार्य श्री विकासजी पाटील यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने , तसेच आदरणीय प्राचार्य श्री प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छान पार पडले.
६) आता नवोदित कवींना नेहमी काव्य सादर करण्यासाठी एक चांगले , आदरपूर्वक उपलब्ध होणारे व्यासपीठ म्हणून ओळख झालेली आहे.
७) लवकरच नाशिक येथे , साहित्यिकांसाठी एक नेहमीसाठी व्यासपीठ उभारावे अशी मागणी करण्यात आली.
८) चहा नाश्ता जेवण या सर्वांचे आयोजन खूप छान होते.

९) बऱ्याच विद्वान लोकांनी खूप साध्या पद्धतीने , मात्र उत्कृष्ट साहित्यिक भाषेत , सर्वांना खूप चांगले मार्गदर्शन केले.
१०) हा कार्यक्रम पार पडण्यासाठी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी , खूप मेहनत घेतली , त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. *त्यांचे आम्ही खूप गोड कौतुक सुद्धा करीत आहोत. कारण कार्यक्रमाचे आयोजन करणे , व त्याला पार पाडणे , हे एका मुलीचे लग्न करून , तिला सासरला पाठवण्यासारखे असते. आणि ही गोष्ट खरोखर आम्हा सर्वांना दिसून आली.

११ ) खऱ्या अर्थाने संमेलनरुपी गीता वाचून , त्याचा थोडक्यात सारांश सांगण्याचा लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे.
जेवढे सर्व कवी वेळोवेळी संमेलनाविषयी प्रतिक्रिया लिहितात , त्या वाचून , आयोजन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना एक प्रकारची नवी प्रेरणा ,ऊर्जा मिळते. आपण केलेल्या कार्याचा , मिळणारा सर्वात मोठा आत्मानंद हा महत्त्वाचा असतो. म्हणून आपण त्यांना वेळोवेळी ऊर्जा मिळावी प्रेरणा मिळावी यासाठी लिहिलेच पाहिजे.* लिहिताना चूक भूल झाली असेल त्यासाठी क्षमस्व..
आपलाच एक कवी ,

श्री. संजय एकनाथ सोनार,
शिंदखेडेकर, नवसारी,गु.रा
============