तंत्रशिक्षणातील सुवर्णकाळ

तंत्रशिक्षण
तंत्रशिक्षण

तंत्रशिक्षणातील सुवर्णकाळ

“तंत्रशिक्षणातील सुवर्णकाळ”
प्राचार्य प्रशांत पाटील

कोविड-19 नंतर संपूर्ण महाराष्ट्रात तंत्रशिक्षणाला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे व दिवसेंदिवस तो वृद्धिंगत होत आहे.
कोविड-19 नंतर संपूर्ण जगभर आयटी क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातही फार मोठ्या प्रमाणावर देशात वाढ होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणाऱ्या काही निर्णयांचाही यावर परिणाम झाला.

१. इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास (आर्थिक दृष्ट्या मागास वर्गासाठी) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी एक लाख उत्पन्नाची अट होती ती वाढवुन आठ लाख रुपये झाली. त्यामुळे आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना सर्व प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात अर्धी शैक्षणिक फी शिष्यवृत्ती स्वरूपात मिळायला लागली.
2. आर्थिक दृष्ट्या मागास वर्गासाठी(EWS) प्रवेश क्षमतेच्या व्यतिरिक्त दहा टक्के प्रवेश मिळायला लागले .त्यामुळे आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला .
3. मागील वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील मुलींना पूर्णपणे शैक्षणिक फी माफ झाली. सरकारतर्फे शिष्यवृत्ती स्वरूपात ती मिळायला लागली. त्यामुळे मागील वर्षी मुलींचे प्रवेश फार मोठ्या प्रमाणावर वाढले आणि त्यात यावर्षी पुन्हा वाढ झाली आहे .

तंत्रशिक्षण
तंत्रशिक्षण

4. एसी व एसटी प्रवर्गातील होस्टेल न  मिळालेल्या मुलांनाही होस्टेल साठी शासनातर्फे स्कॉलरशिप मिळायला लागली ,त्यामुळे शैक्षणिक ही माफी बरोबरच जेवण व राहण्याचा प्रश्न सुटल्यामुळे या प्रवर्गातील प्रवेश फार मोठ्या प्रमाणावर वाढले .
5. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी होस्टेल साठी डॉ पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती मिळायला लागली .त्यामुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळाला .
6. सर्व सरकारी व इतर बँका तर्फे शैक्षणिक व होस्टेल साठी ऋण मिळणे सोपे झाल्यामुळे व त्याची परतफेड पास झाल्यानंतर  करायची असल्यामुळे विद्यार्थी अधिक प्रमाणात तंत्रशिक्षणाकडे आकर्षित झाले .
7. ज्या पालकांचे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे असे सर्व प्रवर्गातील मुलींना तसेच एससी ,एनटी ,एसटी प्रवर्गातील विद्यार्थांना (मुले व मुली) पूर्ण शैक्षणिक फी ची स्कॉलरशिप मिळते, ओबीसी व इबीसी ला अर्ध्या शैक्षणिक फी ची स्कॉलरशिप मिळते.

सर्व विकसित देशात पॉलिटेक्निक शिक्षणाला फार महत्त्व आहे .सिंगापूर मध्ये तर शंभर टक्के दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे व त्यातील फक्त दहा ते वीस टक्के मुले उच्च शिक्षणाला जातात. पॉलिटेक्निक झाल्यावर मुले लगेच नोकरी किंवा व्यवसायाला शिक्षण सुरुवात करतात व गरजेनुसार आयुष्यभर शिकत राहतात .

सर्व विकसित देशात देखील दहावीनंतर गरजेनुसार आवश्यक डिप्लोमा शिक्षण घेऊन कामाला लगेच सुरुवात करायची पद्धत आहे व गरजेनुसार ,बदलणाऱ्या तंत्रज्ञानानुसार ते आयुष्यभर स्वतःला अद्यावत ठेवत राहतात.

आता महाराष्ट्रातही पॉलिटेक्निक नंतर उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांमुळे तसेच व्यवसायातील संधीमुळे पॉलिटेक्निक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग या दोन्ही अभ्यासक्रमांना कोविड नंतर फार मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची पसंती मिळाली आहे .

संपूर्ण महाराष्ट्रात 2016 च्या स्वयं अर्थ सहाय्यता विद्यापीठ कायद्याअंतर्गत आतापर्यंत 32 विद्यापीठ स्थापन झाले आहे.

मी वरील प्रमाणे वेगवेगळ्या स्कॉलरशिप मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्या विषयी म्हटले आहे. परंतु स्वयं अर्थ सहाय्यता विद्यापीठात कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती मिळत नसताना देखील पुण्यात ,पुणे विद्यापीठांतर्गत च्या इंजिनिअरिंग कॉलेज मधील प्रवेशित विद्यार्थ्यांपेक्षाही स्वयं अर्थ सहाय्यता विद्यापीठांमधील  प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या अधिक झाली आहे.

तंत्रशिक्षणातील सुवर्णकाळ
तंत्रशिक्षणातील सुवर्णकाळ

संपूर्ण महाराष्ट्रात अकरावीचे प्रवेश तसेच आर्ट ,कॉमर्स, सायन्स सीनियर कॉलेजचे प्रवेशात फार मोठ्या प्रमाणावर घट होत असताना पॉलिटेक्निक तसेच इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेशात मात्र नोकरी तसेच व्यवसायात उपलब्ध संधीमुळे फार मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे .

पूर्वी नोकरीवर अवलंब राहणारे विद्यार्थी आता मात्र इनोव्हेशन व स्टार्टअप कडे वळताना दिसत आहेत. आता विद्यार्थ्यांचा स्वतःचा रोजगार, व्यवसाय सुरू करण्याकडे फार मोठ्या प्रमाणावर कल वाढतो आहे. सरकारच्या स्टार्टअप साठी नवीन धोरणात्मक निर्णयाचाही याचा फायदा होतो आहे.

महाराष्ट्रात नवीन स्थापन झालेले विद्यापीठांनी तंत्रशिक्षणात फार मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट केली आहे. सरकारच्या कौशल्य विकासासाठी मदत करण्याच्या धोरणामुळे सर्व *खाजगी कंपन्यांनी आपला सीएसआर फंड  कौशल्य विकासाकडे वळवला आहे. महाराष्ट्रातील अनेक कॉलेज तसेच स्वयं अर्थ सहाय्यता विद्यापीठांनी याचा फार मोठा फायदा करून घेतला आहे. अनेक विद्यापीठातील लॅब मध्ये इन्व्हेस्टमेंट आता शेकडो कोटींवर गेली आहे. जगभर जे जे चालले आहे त्याला  अनुसरून आपल्या विद्यापीठांचा, कॉलेजचा विकास करायचा कल महाराष्ट्रात वाढल्यामुळे तंत्रशिक्षणास विद्यार्थ्यांचा पालकांचा ओढा वाढला आहे.

तंत्रशिक्षणात महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीमुळे तंत्रशिक्षणासाठी अनेक बाबतीत महाराष्ट्र पथदर्शी ठरत आहे.सिंगापूर तसेच अनेक विकसित देशांमध्ये नोकरी व व्यवसायातील पॉलिटेक्निक शिक्षणानंतर उपलब्ध संधीमुळे पॉलिटेक्निक शिक्षण मुख्य शिक्षण आहे .आपल्याही  देशात कोविड नंतर तसेच येणाऱ्या काळात पॉलिटेक्निक तसेच इंजिनिअरिंग शिक्षणाच्या बाबतीत लक्षणीय वाढ होताना दिसते आहे.