काळजाचा तुकडा मराठी कविता 

काळजाचा तुकडा मराठी कविता
काळजाचा तुकडा मराठी कविता

काळजाचा तुकडा मराठी कविता 

“काळजाचा तुकडा”
~~~~~~~~~~

स्वकुढी भरण्यासाठी
लागे भाकरी तुकडा
तोच कमविण्यासाठी
मातेला होईल पिडा //१//

काळ्या आईच्या मातीत
काळजाच्या तुकड्याला
स्वयं एकटे सोडीत
जाते पीकं काढायला !!२!!

माय लेक काळजीत
माती अन्न उगवते
आईंच्याच काळजात
दृश्याने ह्या, धस्स होते !!३!!

नाही सोपे शेतकरी
मातेचे जीने जगणे
ठेवावे लागते तरी
तिला असेच वागणे !!४!!

देवा कडेच मागणे
एक सर्वांनी ठेवावे
मायलेका जगवणे
त्यांसी सुखात ठेवावे !!५!!

(से.नि.प्रा.प्रकाश बिरारी.खमताणे,सटाणा)
{मोबाईल नं.- 9403307521}
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मराठी कविता 
मराठी कविता