मायबोली ही मायेची ओवाळणी
मायबोली ही मायेची ओवाळणी,
शब्दामधुनी वाहे गोडवाणी ॥
गोड बोला, ओता प्रेम उरात,
मातृभाषा देई शांती अंतरात ॥
ना विसरू मायबोलीचा सुवास,
जिथे शब्द थकती, तिथे तिचा प्रकाश ॥
ज्ञानझरे उगमती तिच्यातून,
संस्कृतीची वाहते तिच्या पूरातून ॥
तुका म्हणे, हीच खरी आरती,
मातृभाषेच्या होऊ या भारती ॥

या संत तुकारामांच्या अभंगाला शोभेल असंच कार्य प्राचार्य श्री प्रशांत पाटील सर श्री विकास पाटील सर आणि त्यांची टीम करत आहे.
उत्तर महाराष्ट्र विकास मंडळ तर्फे पार पडलेले अहिराणी कवी संमेलन हा खरंच एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
या कार्यक्रमात भोजन व्यवस्थेसह चहा-पाण्यापासून ते आत्मिक समाधानापर्यंत सर्व काही उत्तमरीत्या जमवले गेले होते.
साहित्यिकांची मांदियाळी, भाषेचा उत्कट ध्यास आणि रसिकांची उपस्थीती – सर्वच काही हृदयस्पर्शी होतं.
आयोजकांनी केवळ एक कार्यक्रम केला नाही, तर धन, तन आणि मन एकवटून भाषा, संस्कृती आणि साहित्याची सेवा केली आहे.किंबहुना करत आहेत. ते खरंच स्तुत्य आहे. कौतुकाच्याही पलीकडचे आहे त्यांचं कार्य म्हणजे निस्वार्थ भावनेतून साकारलेली एक साहित्ययात्रा आहे.
अशा कार्यक्रमांनी अहिराणी भाषेला नवे आयाम मिळतात, नव्या संवेदना जन्म घेतात आणि आपण सारे एका छान भावविश्वात न्हालेलं वाटतं. अस नकळत मनात येत की , “*घरमा अहिराणीच बोलणं पडी बरं का..” “पोरेसले भी अहिराणी शिक्षण देणं पडी*” हा जो मनात आलेला विचार आहे हेच आयोजकांचे यश आहे..
अशा आयोजकांना खास करून कार्याध्यक्ष श्री प्रशांतजी पाटील सर आणि अध्यक्ष विकास पाटील सर यांना *मन:पूर्वक सलाम!* वंदन
भाषेसाठी त्यांची तळमळ आणि सेवाभाव कायम प्रेरणा देईल.
पंकज.हे.भामरे
सचिव, उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन