Shravan Marathi Kavita Sangrah श्रावण कविता मराठी

Shravan Marathi Kavita Sangrah
Shravan Marathi Kavita Sangrah

Shravan Marathi Kavita Sangrah श्रावण कविता मराठी

चारोळ्या श्रावण सरींच्या

{}{}चारोळ्या श्रावण सरींच्या{}{}
१]सरसर झरझर
येई श्रावणाची सर
पावसाची राहिलेली
पुरी कर गं कसर॥
२]गेला मृग ही आषाढ
आला आता श्रावणात
तुझं श्रावणाचं नातं
पावसारे भावनात॥
3]सरसर झरझर
सरी आल्या गात गात
ओसरीत माझिया ग
श्रावणात नाचतात॥
४]कधी येते कधी जाते
झिम झिमत झिमत
खेळ श्रावणाची सर
लपाछपीचा खेळत॥
५]कधी श्रावणाची सर
येते उन्हामधे न्हात
रविकिरणांच्या सवे
धून श्रावणाची गात॥
–निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ , नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.
—————————–

कर श्रवण श्रावणा

श्रावण
श्रावण

🌦कर श्रवण श्रावणा🌦
नाव तुझं श्रावणा रे
कुणी ठेवलं श्रावण
एक ठाऊक आम्हाला
           बाळ कथित श्रावण॥धृ॥
माता पिता तरसले
त्याचे त्याचिया वाचून
तसे नको तरसवू
         आम्हा तुझिया वाचून॥१॥
बाळा वाचून व्यथित
गेले प्राणच सोडून
शर तसा कोणता रे
            गेला तुला अडवून॥२॥
भर पावसाचे दिन
गेले पावसा वाचून
कमी उरली सुरली
          काढशिल तू भरुन॥३॥
बळीराजा बसला रे
माझा हताश होऊन
किती विनवू तुला रे
           विनवून विनवून ॥४॥
कधी करशिल माझी
विनवणी तू श्रवण
कसे कळेना जीवनी
    नाव सार्थकी लावणं॥॥५॥
     –निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड एरंडोल जि.जळगांव.
🌦🌦🌦🌦🌦🌦🌦🌦🌦🌦🌦🌦🌦🌦

Shravan Marathi Kavita Sangrah
Shravan Marathi Kavita Sangrah

श्रावणमास

🌧️🌧️श्रावणमास🌧️🌧️

अवखळ हा पाऊस बरसे श्रावणात
धरणीसंगे मने चिंब भिजतात

खेळ चालत असे ऊन सावल्यांचा
इंद्रधनुत होई मेळ सप्तरंगाचा

नागपंचमीला चला जाऊ वारुळाला
देण्या नैवद्य दुधाचा नागराजाला

झिम्मा फुगडीने चाले रात्रीचा जागर
सखी जमल्या माहेरी पुजण्या मंगळागौर

सण होतो साजरा नारळी पौर्णिमेचा
भाऊबहिणीच्या प्रेमाच्या रक्षाबंधनाचा

गोपाळकाल्याची चाखु अवीट गोडी
कान्हा खेळतो, फोडतो दहिहंडी

ढवळ्या पवळ्या उपसतात कष्टाची रास
पोळ्याला देऊ त्यांना पुरणपोळीचा घास

            ✍️कवी✍️

     ☔मकरंद जाधव☔

श्रावण
श्रावण

श्रावण मासी

🌿श्रावण मासी 🌿

🔆बाल कवी ठोंबरेची श्रावणाला श्रीमंतीचा साज चढविणारी अजरामर कविता 🔆

   श्रावण मासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहीकडे.
क्षणात येते रिप रिप शिरवे,
क्षणात फिरुनी ऊन पडे.

वरती बघता इंद्रधनुचा,
गोफ दुहेरी विणलासे.
मंगल तोरण काय बांधले,
नभोमंडपी कुणी भासे.

झालासा सूर्यास्त वाटतो,
सांज अहाहा तो उघडे.
तरुशिखरांवर, उंच घरांवर,
पिवळे पिवळे ऊन पडे.

उठती वरती जलदांवरती,
अनंत संध्याराग पहा.
पूर्ण नभांवर होय रेखिले,
सुंदरतेचे रूप नवा.

खिल्लारे ही चरती रानी,
गोपहि गाणी गात फिरे.
मंजुळ पावा गात तयाचा,
श्रावणमहिमा एकसुरे.

सुवर्णचंपक फुलला,
विपिने रम्य केवडा दरवळला.
पारिजातही बघता भामा,
रोष मनीचा मावळला!

सुंदर परडी घेऊनि हाती,
पुरपकंठी शुद्धमती.
सुंदर बाला या फुलमाला,
रम्य फुले-पत्री खुडती.

देवदर्शना निघती ललना,
हर्ष माईना हृदयात.
वदनी त्यांच्या वाचूनी घ्यावे,
श्रावण महिन्याचे गीत!
            🌿बालकवी🌿

श्रावण कविता मराठी
श्रावण कविता मराठी

गोड गोजीरा श्रावण आला

गोड गोजीरा श्रावण आला
*************************
गोड गोजीरा श्रावण आला
आला वसुंधरेचा सण
श्रावणाच्या सुंदरतेने
शहारुन गेले मन

सरसर बरसल्या पाऊस धारा
गंधाळली माती
आनंदाने घरंगळत आले
दवबिंदूचे मोती

सैरभैर झालीत पाखरे
मैना गाते मंजूळ गाणी
दऱ्याखोऱ्यातून वाहते
खळखळ पाणी

पाना फुलांच्या गळाभेटीने
गंध फुलांचा दरवळतो
निळ्या निळ्या आभाळातून
इंद्रधनु डोकावून पहातो

उभा डोंगर पांघरूण घेतो
शालू हिरवा हिरवा
हळुवार अलवार मिठीत घेतो
गोड गुलाबी गारवा

गर्द गडद धुक्यातही
झाडेझुडपे लाडावतात
खेळता खेळता लता लतिका
एकमेकास छेडतात

हिरव्या हिरव्या गालीच्यावर
श्रावण हळूच अवतरतो
फुलवून पिसारा मोर कसा
थुईथुई नाचतो

रूबाब देखणा श्रावणाचा
डोळेभरून पाहवा
रंगबेरंगी आसमंत सारा
कवेत धरुन घ्यावा

संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)
९५७९११३५४७
९४२२८९२६१८