मूकबधिर पण बोलके जीवन

मूकबधिर पण बोलके जीवन
मूकबधिर पण बोलके जीवन

मूकबधिर पण बोलके जीवन

मूकबधिर पण बोलके जीवन’
(एक मूक पती पत्नीची श्रमगाथा)
लेखन:-संजय धनगव्हाळ
**************************
असं म्हणतात की केल्याने होत आहे रे आधी केले पाहिजे किंवा करणाऱ्याला खूप काही असतं नाकर्त्याला काहीच नसतं अशी एक म्हण आहे म्हणजे करायचं ठरवलं तर खूप काही करता येत या अर्थी.एखादा खूप शिकलेला आहे पण हाताशी काहीच काम नाही त्यावेळी आपल्या उच्च शिक्षणाचा अवडंबर न वाजवता कसलीच लाज न बाळगता कोणतंही काम करायचं ठरवलं तर यश निश्चित मिळते सुरवातीला काही दिवस अडचणीचे जातात पण धीर सय्यम ठेवला तर यश फार दुर नसते शिवाय यश मिळवायचं असेल तर कष्ट मेहनतीशिवाय पर्याय नसतो.यश सहजपणे मिळत नाही त्यासाठी घाम गाळावा लागतो.

सांगायच तात्पर्य असे की काही निमित्ताने मी नाशिकला गेलो होतो भावाकडे.तो रहात असलेल्या जत्रा हॉटेलच्या चौकात तेथे पाणीपुरीचा स्टॉल दिसला तिथे जाऊन मी पाणीपुरीची मागणी केली त्यांनी तेथे मेन्यू कार्ड चिटकवलेला होता त्यावर बोट ठेवून यापैकी काय हवं असं बोटाने इशारा करत सांगीतले  सुरवातीला मला काही कळेना मी बोलायचो ते फक्त बोटांच्या इशाऱ्यावर मला सांगायचे.मग लक्षात आले की ते दोघं पती पत्नी मुकबधीर होते.आणि तेव्हाच त्यांच्या कर्तृत्वाला दणदणीत सलाम केला. त्या़ंच कौतुक करताना आपण काय बघतोय याच आश्चर्यही वाटलं.तेथे त्यांच्या शेजारी असलेल्या एका स्टॉलवाल्याकडून त्यांच्या बद्दल विचारपूस केल्यावर धन्य झालो.

कारण मी अशा जोडप्यांना भेटलो की जे एकू ही शकत नव्हते आणि बोलू ही शकत नव्हते.पण त्यांचे कष्ट त्यांच्या डोळ्यातील जिद्द आणि हातातील मेहनत,त्यांची इच्छा शक्ती हेच त्यांच्या संवादाचं माध्यम होतं.मूक असूनही त्यांच्या चेहऱ्यावर मूक असल्याचा भाव दिसत नव्हता.त्यांना कोणाकडून मदत नको होती,सहानुभूतीच बक्षीसही नको होत त्यांना हवी होती काम करण्याची,कष्ट करून जगण्याची संधी.ती त्यांनी पाणीपुरीचा स्टॉल लावून मिळवली.

स्टॉलवर आलेल्या प्रत्येक ग्राहकाला बोटाच्या ईशाऱ्याने काय हवं विचारताना त्यांच्या चेहऱ्यावर हसूच असतं.हे सर्व पाहताना जाणवलं की आज आपल्या अवतीभोवती अनेक उच्च शिक्षित तरूण आहेत जे काही काम न करत फक्त बसून आहेत.शारीरिकदृष्ट्या सक्षम असून ही रिकामटेकडे फिरताना दिसतात.कामाची लाज न बाळगता.सरकारी नौकरी मिळेपर्यंत काहीच काम करायचं नाही किंवा ही माझ्या लायक नौकरी नाही असं म्हणून वेळ घालवतात.अरे ज्यांच्या कडे सर्व काही आहे ते हताश आहेत आणि ज्यांच्या कडे काहीच नाही ते मूकबधिर पती पत्नी निर्धाराने उभे आहेत.प्रत्येक ग्राहकाला हसत खेळत पाणीपुरी खाऊ घालताना ते मुकबधीर जोडपं शिकवत की कष्टाला पर्याय नाही.स्वाभिमान विकत घेता येत नाही तो कमवावा लागतो.

या मूकबधिर जोडप्याने न बोलता संदेश दिला आहे की तुमच्या परिस्थितीवर नाही तर तुमच्या दृष्टीकोनावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे.ते हाताच्या इशाऱ्यांनी संवाद साधतात,ग्राहकांच समाधान पाहून त्यांचे डोळे हसतात आणि भाषा नसून ही त्यांचा प्रत्येक भाव मनाला भिडतो. त्यानी कुणाकडे हात पसरवले नाही ना कुणाकडं काही मागीतल त्यांनी फक्त कष्टाची निवड केली,मूक राहू पण आत्मसन्मानाने जगू.खरतर प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी संघर्षाचा असतो जणू काही युध्दासारखाच पण त्यांनी कष्टाने मिळवलेला त्यांच्या ताटातला घास त्यांच्या विजयाची नांदी देतो.त्यांनी आवाज गमवला पण हातांना रिकामं राहू दिले नाही.

काम करत स्वबळावर त्यांनी त्यांच आयुष्य घडवलं.कष्ट करून ग्राहकांना पाणीपुरी खाऊ घालणाऱ्या त्या मुकबधीर पती पत्नी कडे पाहून असं वाटतं की आपण किती बोलतो पण काहीच करत नाही आणि त्यांनी काहीही न बोलता त्यांचं आयुष्य उभं केलं.ते कुणाच्या सहानुभूतीवर नाही तर कष्टाने जगतात.ते स्वतःला अपंग म्हणवून घेत नाही,जगण्याशी भांडत नाही,परिस्थितीला दोष देत नाही शब्दांशिवाय जगणंही गाणं होवू शकतं हे त्यांच्या प्रत्येक दिवसाचं उत्तर असतं हे अधोरेखित करण्यासारखं आहे.रस्त्याच्याकडेला त्यांचा स्टॉल आहे गर्दीत कोणाचं लक्ष जात नाही पण एक मूक पण बोलका संसार कोपऱ्यात उभा असलेला दिसतो.ते दोघं बोलू शकत नाही एकू शकत नाही पण त्यांच्या हातात श्रमाच जेत आणि चेहऱ्यावर समाधानाच हास्य दिसत.

त्यांनी बनवलेली पाणीपुरीची चव जरा वेगळी लागते कारण ती पोटासाठी नाही तर स्वाभिमानासाठी तयार झाली असते.आजच्या या धकाधकीच्या मतलबी स्वार्थी जगात न बोलता ही स्वाभिमानाने,कष्टाला महत्व देऊन जगणार त्या मूकबधिर पतिपत्नी कडून  मनसोक्त पाणीपुरी खाऊन तृप्तीचा डेकर देतांना त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधानाचा आनंद मी डोळेभरून पाहिला आणि डोळ्यात बंद करून घेतला.सुरवातीला त्यांच्याकडे तोडकी मोडकी गाडी होती आता स्टील कोटेड गाडी तयार करून छान डेकोरेट केली आहे शिवाय प्रामाणिकपणे कष्ट करून स्वताच्या मेहनतीने स्वतःच हक्काचं घर सुध्दा नाशिक सारख्या शहरात घेतलं.कधी गेला तर एकदा चित्रा हॉटेलच्या चौकात उतरून त्या मूकबधिर जोडप्यांच्या स्टॉलवर जा त्यांच्या हातून पाणीपुरी खा आणि त्यांच्या संघर्षात त्यांच्या कष्टाचं सौंदर्य पहा हाच खरा माणूसकीचा विजय असेल.

ते बोलत नाही पण
त्यांची नजर बोलते
एक अस्वस्थ शहरात
त्यांच्या कष्टाची जिद्द डोलते

स्टॉलवर पाणीपुरी विकतात*
हात जोडून नम्रतेने वागतात
हातांची भाषा आणि
मनाने संवाद साधतात

ना गाऱ्हाणं ना तक्रार
ना मगाण कोणाचं
कष्टाच्या  घामात
भिजलेल जगणं त्यांच

कोणी हसून जात
कोणी निघून जात
पण ग्राहकाच समाधान मात्र
त्या स्टॉलवर राहून जातं

ते पैसे घेतात हसु देतात
हातांच्या इशाऱ्यांने पुन्हा या सांगतात
कौतुकाचे बोल पदरात घेऊन
ते दोघं पती पत्नी श्रीमंत होतात

संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)
९४२२८९२६१८
९५७८११३५४७

मूकबधिर पण बोलके जीवन
मूकबधिर पण बोलके जीवन