शिवारायांचे 12 किल्ले युनेस्कोनें जागतिक वारसा जाहीर केलें

शिवारायांचे 12 किल्ले युनेस्कोनें जागतिक वारसा जाहीर केलें
शिवारायांचे 12 किल्ले युनेस्कोनें जागतिक वारसा जाहीर केलें

शिवारायांचे 12 किल्ले युनेस्कोनें जागतिक वारसा जाहीर केलें

शिवारायांचे साल्हेरसह एकूण 12 किल्ले युनेस्कोनें जागतिक वारसा जाहीर केलें.

शिवारायांच्या 12 गड किल्याना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. आता हे 12 किल्ले जगाच्या नकाशावर येतील. शिवारायांना पुणे आणि सुप्याची जहागिरी असताना महाराजांनी रायगड ही राजधानी स्वीकारली. कारण हा गड दऱ्या डोंगर आणि दाट जंगलानी वेढला होता. अशी जागा शत्रूला जिंकणे कठीण होते. महाराजांच्या काळात 100 वर्षाहून अधिक काळ भारतात रुजलेले मोगल सत्ता होती. त्यांच्याकडे लाखोच्या फौजा आणि अब्जो रुपयाचा खजिना होता. अशा महासत्तेला आव्हान देणे अत्यंत जिकरीच आणि कठीण काम होतं.

शिवारायांचे 12 किल्ले युनेस्कोनें जागतिक वारसा जाहीर केलें
शिवारायांचे 12 किल्ले युनेस्कोनें जागतिक वारसा जाहीर केलें

तें अवघड काम शिवारायांनी लिलाया पेलले. कारण महाराज नुसत्या बळाचा वापर करत नव्हते तर तें बुद्धीचाही वापर करत होते. अगडबंब विराट प्रस्तापित महाशक्ती विरुद्ध,  नवजात मराठी सत्ता सामना विषम,  म्हणून तों मराठ्यांसाठी अवघड होता. पण नेतृत्व शिवरायांचं होतं. त्यामुळे अशक्य काहीच नव्हतं.शिवराय जात्याच असामान्य बुद्धी असलेला नरसिंह. त्यांत महालिंगदास अहिराव यांची शिकवण तीन पिढ्या घेत होती. त्यातून मालोजी राजे , शहाजी राजे आणि शिवाजी महाराज अशी विरांची भक्कम फळी तयार झाली. सद्गुरू महालिंगदास अहिराव यांच्या पंचोपाख्यानं ग्रंथातून तें घडून गेलं.

पंचोपाख्यान ग्रंथात महालिंगदास अहिराव यांनी, स्वातंत्र्य आणि स्वराज्य यांची महिती सांगितली, राष्ट्रवाद सांगितला. गड किल्याचे महत्व सांगितले. त्यांची निगा, रचना, वापर आणि महत्व सांगितलं. तें महाराजांनी तंतोतंत अमालात आणलं आणि स्वराज्य निर्माण झालं. महाराजांची सर्व भिस्त ही गड किल्यावर होती. हे किल्लेच स्वराज्याचा पाया ठरले. त्यांचे महत्व ओळखून भारत सरकारने शिवारायांच्या 12 किल्यांचे महत्व आणि मूल्य युनेस्को कडे पाठविले. युनेस्कोने हे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळे म्हणूनं जाहीर केले. हा महाराष्ट्र आणि शिवरायांचा गौरव आहे. संपूर्ण भारतातून फक्त शिरायांच्या 12 किल्याना हा सन्मान मिळाला याचा आम्हाला गर्व आहे. त्यात रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विययदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडू राज्यातील जिंजी यांचा समावेश आहे.

शिवारायांचे 12 किल्ले युनेस्कोनें जागतिक वारसा जाहीर केलें
शिवारायांचे 12 किल्ले युनेस्कोनें जागतिक वारसा जाहीर केलें

खांदेशातील साल्हेरगड हा महाराजांच्या डोळ्यात भरलेला गड आहे. सुरते वरील स्वारीच्या वेळी रस्त्यात लागणारा हा अत्यंत महत्वाचा गड आपण जिंकून घ्यावा असे महाराजांना वाटत होते. म्हणून मग त्यांनी, मोगलांच्या ताब्यात असणारा हा गड 1771 मध्ये रामचंद्रपंत अमात्य आणि प्रतापराव गुजर यांना मोहिमेवर पाठवून साल्हेर गड जिंकून स्वराज्यात सामील केला. साल्हेर गड हा बागालान तालुक्यात आहे. बागलान हा खान्देशांतील सर्वात जास्त गड किल्ले असणारा तालुका आहे. इथे बहुतेक सर्व किल्ले जोडी जोडी नें आहेत. आणि तें सर्व नैसर्गिक आहेत. साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी, रावळ्या-जावळ्या असे किल्ले आहेत. यां सर्व भागावर आपलें नियंत्रण असावे म्हणून महाराजांनी साल्हेरगड जिंकून घेतला.

महाराजांना थोड अधिक आयुष्य मिळाले असतें तर त्यांनी संपूर्ण खान्देशवर नियंत्रण मिळविले असतें. कारण त्यांच्या पूर्वजांचे मूळगाव वेरूळ हे खान्देश आणि मराठवाड्याच्या सीमेवर आहे. तें वेरूळ त्यांना स्वराज्यात घ्यायचे होते. महाराजांचे 12 किल्ले जगाच्या आणि पर्यटनाच्या नकाशावर आले याचा खूप आनंद, हर्ष, स्वाभिमान आणि गर्व आहे. महाराजांनी ज्या भवानी तलावरीच्या साहाय्याने पराक्रम, शौर्य गाजविले त्याची कथा यां गाण्यात ऐका.

व्हिडिओ क्लिप मधील हे अहिराणी गाणं, चमके शिवबानी तलवार आवडलं तर सब्स्क्राईब करा, लाईक द्या आणि फॉरवर्ड करा!
 शिवराय यांच्या बद्दल आदर म्हणून कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव! यां घोषणेचीं नोंद करा!

बापू हटकर