लावणी
👉👉लावणी👈👈
नवरा न त्येची बायकुला
सौंसाररथाचं म्हणंती चाकं …
कवा मुडंल नाय भरवसा
सदा पुर्षाच्या मनात धाक…
हो.. हो.. हो..
जात पुर्षांची लई लई गुणी
त्येची खोडच बाई ती जुनी
नामी युगत शोधली कुणी…हो…हो..
फिरती टेपनी संग घेऊनी//ध्रु //
कुठं बाधा न यावी आड
नगं थांबाया आपुलं गाडं
टेपनीचं करुनिया लाड…हो…हो..
संग सदा दिसें चिपकूनी //1//
जसी ती गवसली गरफ्रेंड
घोडं हुंगेना अजिबात पेंड
तरणा गडी असो, कि धेंड…हो…हो..
पाय उठेना तिजवाचुनी //2//
इथं झुरतंय ह्ये पंचर चाक
मात करतंय दुधावर ताक
दौडे उजळ माथ्यानं नाक… हो…हो..
रीत घेतलीया उमजूनी //3//
=======================
कवी..प्रकाश जी पाटील(पिंगळवाडे)