लढवंय्या हरिहर गड भाग-०१ हरिहर किल्ला
लढवंय्या हरिहर गड
लढवंय्या हरिहर गड
(हर्षवाडी ता.त्र्यंबक,जि.नाशिक)
भाग-०१
नानाभाऊ माळी
हरिहर म्हणजे शिवविष्णूचं एकरूप असलेलं आगळेवेगळे रूप!हरहर महादेवाची वैश्विक आध्यत्मिक कृपा अन भगवान विष्णूचीं संचालन कृपादृष्टी असलेला आगळावेगळा किल्ला म्हणजे हरिहर गड!गड नेहमीचं लढ म्हणत असतो!छातीत हत्तीची शक्ती!वाघाची झेप!छातीत धडधड फक्त विजय मिळविण्याची असते!सिंह छत्रपती शिवाजी राजांची दूरदृष्टी,देवी भवानीची कृपादृष्टी निसर्गाचीं देणगी असलेला किल्ला म्हणजे हरिहर किल्ला आहें!किल्ला सत्ता स्थानाचं केंद्रबिंदू राहिलेला असतो!
असाच यादव कालीन किल्ला हरिहर गड आहें!भीती, शक्ती, भक्ती, साहस,माणसाला सतत आव्हान आणि आवाहन देत असलेल्या हरिहर किल्ल्यावर अनेक सत्ता येऊन गेल्या असतील!साहसी,धाडसी लढवंयांचं स्फूर्तीस्थान असलेला किल्ला राष्ट्रप्रेमाची हाक देत असतो!छत्रपती शिवारायांचा शूर, लढाऊ बाना शिकवीत असतो!हरिहर किल्ला दुरून जितका नितांत सुंदर दिसतो तितका भीतीही दाखवतो!देशातील कठीण, अवघड जे काही निवडक किल्ले आहेत त्यात हरिहर किल्ला आहें!किल्ला अंगातील शक्तीचीं, मनाच्या युक्तीची परीक्षा घेत असतो!हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी आत्मिक धाडस केलं अन आम्ही किल्ल्यावर चढाईला निघालो.
स्वप्न साकार होणे भाग्यातं असावं लागतं!योगायोग सुद्धा असतो!भाग्यातला योगायोग सकारात्मकतेचं मधुर फळ असतं!चार-पाच दिवसांपूर्वी मी स्वप्न पाहिलं होतं! ‘मी पावसाळ्यात उंच उंच किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलो होतो!’… अचानक माझ्या नातूनें ‘खाडकन दरवाजा’ उघडला होता!त्या ‘धडाम धूमच्या’ आवाजामुळे माझं स्वप्न अर्धवट राहिलं होतं!मी मनोमन नाराज झालो होतो!निसर्ग सौंदर्याचीं मुक्त्तहस्ते उधळण लाभलेला किल्ला पूर्णपणे स्वप्नांत पूर्ण पाहू शकलो नव्हतो!असं म्हणतात ‘कृतीची जोड दिली तर अपूर्ण स्वप्न पूर्ण होत असतं!’ ईश्वराचीं कृपादृष्टी होती!आम्ही दिनांक ५ जुलै २०२५ रोजी पुण्याहून साधारण २४० किलोमीटर,नाशिकहून ४० किलोमीटर अन त्र्यंबकेश्वरपासून साधारण किलोमीटर २५ किलोमीटर लांबवर असलेला कठीण किल्ल्यांपैकी एक असलेला *हरिहर गडाच्या* ट्रेकला निघालो होतो!

ठरल्या प्रमाणे श्री.शाम कुंभार सरांच्या कानिफनाथ ट्रेकिंग अँड हेल्थ ग्रुप सोबत गेलो होतो!खाजगी बस होती!दोन दिवसाचा प्रवास होता,०५ अन आज ०६ जुलै!पुण्याहून ०५ जुलैला निघालो होतो!नाशिकला श्रीकपालेश्वर मंदिर, श्रीकाळाराम मंदिर दर्शन घेऊन पंचवटीतं पवित्र गोदावरी नदीच दर्शन घेतलं!नदी काटोकाट भरून, दुथडी भरून वाहात होती!नदीला पूर आला होता!झिमझिम पाऊस सुरू होता!छत्री,रेनकोटमध्ये लोकांची पळापळ सुरू होती!पावसातचं नाशिकहून १२ ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या श्रीत्र्यंबकेश्वरला निघालो होतो!साधारण ३० किलोमीटर अंतर असावं!संध्याकाळी श्रीत्र्यबंकेश्वरला पोहचलो होतो!पावसाचा जोर खुपचं होता!प्रवासी,श्रद्धाळू रेनकोट, छत्र्यातं मंदिराकडेस्वप्न साकार होणे भाग्यातं असावं लागतं!योगायोग सुद्धा असतो!
भाग्यातला योगायोग सकारात्मकतेचं मधुर फळ असतं!चार-पाच दिवसांपूर्वी मी स्वप्न पाहिलं होतं! ‘मी पावसाळ्यात उंच उंच किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलो होतो!’… अचानक माझ्या नातूनें ‘खाडकन दरवाजा’ उघडला होता!त्या ‘धडाम धूमच्या’ आवाजामुळे माझं स्वप्न अर्धवट राहिलं होतं!मी मनोमन नाराज झालो होतो!निसर्ग सौंदर्याचीं मुक्त्तहस्ते उधळण लाभलेला किल्ला पूर्णपणे स्वप्नांत पूर्ण पाहू शकलो नव्हतो!असं म्हणतात ‘कृतीची जोड दिली तर अपूर्ण स्वप्न पूर्ण होत असतं!’ ईश्वराचीं कृपादृष्टी होती!आम्ही दिनांक ५ जुलै २०२५ रोजी पुण्याहून साधारण २४० किलोमीटर, नाशिकहून ४० किलोमीटर अन त्र्यंबकेश्वरपासून साधारण किलोमीटर २५ किलोमीटर लांबवर हर्षवाडी गावाच्या हद्दीत असलेला कठीण किल्ल्यांपैकी एक असलेला हरिहर गडाच्या ट्रेकला निघालो होतो!
नाशिकला श्रीकपालेश्वर महादेव मंदिर,श्रीकाळाराम मंदिरचं दर्शन घेऊन पंचवटीतं पवित्र गोदावरी नदीच दर्शन घेतलं!नदी काटोकाट भरून, दुथडी भरून वाहात होती!नदीला पूर आला होता!झिमझिम पाऊस सुरू होता!छत्री,रेनकोटमध्ये लोकांची पळापळ सुरू होती!पावसातचं नाशिकहून १२ ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या श्रीत्र्यंबकेश्वरला निघालो होतो!साधारण ३० किलोमीटर अंतर असावं!संध्याकाळी श्रीत्र्यबंकेश्वरला पोहचलो होतो!पावसाचा जोर खुपचं होता!प्रवासी,श्रद्धाळू रेनकोट, छत्र्यातं मंदिराकडे गेलो होतो!गर्दी खूप होती!बारीतील रांगामधून जाने अशक्य होतं!श्री त्र्यंबकेश्वराचं दर्शन मंदिरा बाहेरूनचं घेतलं!संध्याकाळी सात-किलोमीटर दूर मुक्कामी पोहचलो होतो!रात्रभर पावसाचा जोर होता!
आज ६ जुलैचीं पहाट उजाडली तशी आम्ही सर्व ट्रेकर तयार झालो!अन पावसातचं सात किलोमीटर लांबवर असलेल्या हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन पोहचलो!काल ०५ जुलै पासून पावसाने धो धो सुरू ठेवलं होतं!खेड्यापाड्यातून जातांना रस्त्यावर अनेक कौलारू घर दिसत होती!मध्येचं घाट माथा!धुकं, अंधारून आलेले ढग अन हिरवाईची चादर आमच्या स्वागतास सज्ज होते!हवेत गारवा देखील होता!आमचीं बस जसजशी वर चढत होती तसतसें घनदाट जंगल आमच्या स्वागतास झाडांच्या फांदया हलवून उभं होतं!पावसाळी दुधाळी ढगात,धुक्यातून खोल खोल पाण्याची खाच खळगे हवरवलेंली दिसली!आजूबाजूचा निसर्गाचा अविष्कार पाहून डोळे दिपत होते!
साहस, जिद्द, आत्मविश्वास सोबत असलें की साहसाला जिंकण्याची जबरदस्त ओढ लागते!आत्मविश्वास फुलून वर येऊ लागतो!आम्ही वळणदार रस्त्याने उंचउंच वरवर जात होतो!छोटे मोठे झरें, धबधबे उताराकडे धाव घेतांना दिसत होते!पावसाने पक्के ठरवलं होतं,’थांबायचं नाही! सरसर, शिरशीर, चालुचं ठेवायची!’ ढग समुद्रावररून पाणी भरून आणत होते!धरतीवर सांडत होते!सृष्टीचा मनोहारी खेळ काही वेगळाचं असतो पहा ना!

हर्षेवाडी गाव आलं होतं!बस थांबली!आम्ही सर्व ट्रेकर धो धो पावसात हरिहर गडाच्या चढाईला निघालो!स्वप्नात पाहिलेला किल्ल्यावर निघालो होतो!प्रतिकूल परिस्थितीतं लढाऊपणा दाखविण्याची आजचा!०६ जुलै चा आव्हानात्मक दिवस होता!आज आषाढी एकादशी दिवशी!पंढरपूर निवासी श्रद्धा आराध्य भगवान श्रीविठ्ठल माऊलीचीं इंद्रायणी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना पवित्र जलसिंचन करीत होती!भक्तांची भक्ती पावन होत असतांना आम्ही आज एकादशी दिवशी हरिहर किल्ल्यावर चढाईला निघालो होती!आमच्यावर हरी-विष्णू, हर-महादेव, श्रीविठ्ठल या दैवतांचीं कृपा होती!छत्रपती शिवाजी राजांची धाडसी, लढाऊ वृत्ती, शक्ती सोबत होती!आम्ही उंच कठीण किल्ल्यावर अथकपणे वर्षाव करणाऱ्या पावसाच्या साथीने निघालो होतो!घसरडे, निसरडे, उभट कच्च्या पाय वाटेने निघालो होतो!
याचं ट्रेकचा भाग-०२ मध्ये पुन्हा भेटू!नमस्कार
नानाभाऊ माळी
हरिहर किल्ला, हर्षवाडी, त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक
मो.नं-९९२३७६५००
दिनांक-०६ जुलै २०२५