kavita in marathi कसे वर्धावे आयुष्य
कसे वर्धावे आयुष्य
प्राण वायूचे वाहक
वृक्ष विज्ञानी ही साक्ष
वटवृक्ष दिर्घायुषी
प्राण वायूचा अध्यक्ष ॥धृ॥
सत्यवान सावित्रीची
कथा जुनाट ती रुक्ष
सुता वरुन कल्पित
स्वर्ग गाठला अदृश्य ॥१॥
सुतामधे बंदिवान
पहा झाला वटवृक्ष
दिर्घायुषी वटवृक्ष
प्राण वायूचा अध्यक्ष ॥२॥
प्राणवायू लाभे स्त्रीस
अशा पुजिता वृक्षास
प्राणवायू सहवास
अन्य काही नसे खास॥३॥
प्राणवायू लाभे स्त्रीस
नाही तिचिया पतीस
कशी लाभावी वृध्दी हो
तिच्या पतीच्या आयुस ॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
मो.नंबर- ९३७१९०२३०३.
