पॉप स्टार रिहाना चा संघर्ष (Rihanna)

पॉप स्टार रिहाना
पॉप स्टार रिहाना चा संघर्ष

पॉप स्टार रिहाना चा संघर्ष

एका आवलीया पाॕपगायिका रिहाना आणि तिचा संघर्ष पाहून एकच म्हणता येईल रिहाना होणे सोपे नाही. आपल्याला पाॕपगायक रिहाना कालपर्वा थोडीफार कळली.ते अनंत अंबानिंच्या प्री वेडींग समारंभात गायली तेव्हा.प्रचंड ट्रोल झाली पण तीचा संघर्ष एवढा थरारक आणि अंगावर शहारे आणणारा रोमहर्षक आहे,म्हणून ती ट्रोलींगला कचरा पेटी दाखविते.

कारण ट्रोलींग ९९%एकतर्फी असते हे तिला कळते कारण ती काय आहे ,माहित असल्याने लोकांच्या चष्म्याने जे तिच्याकडे पहातात त्यांना रिहाना काय कळणार?एवढ नक्की की या संघर्षाच्या भडाग्नीत जगली कशी?यशोशिखरावर विराजमान झाली कशी?आज जगातील सर्वात श्रीमंत पाॕपगायिका व संगीतकार झालीच कशी?तेही वयाच्या ३५व्यावर्षी?आहे ना अचंबित आणि अविश्वसनीय?

पॉप स्टार रिहाना जन्म लहानपण

हिचा जन्म..२०फेब्रुवारी१९८८-क्रिकेटची प्रतिपंढरी बार्बाडोस मध्ये जिथे गॕरी,वाॕरेल,हेन्स,लाॕईड ,गार्नर,माल्ल्कम,कन्हैय्या,गोम्स सारखे महाराथी क्रिकेटर्स जन्माला आलेत.ही आयरिश वडील आणि अफ्रिकन अशा अॕफ्रोआयरिश मिस्र वंशाची.जीचे नांव राॕबिन रिहाना फेंटो.

रिहाना
पॉप स्टार रिहाना चा संघर्ष

ही लहानपणी सागरकिनारी मासे,कपडे,खेळण्या आणि काय काय विकी,गणतीच नाही.अर्थात वडीलांबरौबर,वडील ड्रगिस्ट,व्यसनाडिक्ट,रागीट ,नशेच्या धुंदीत तिच्या आईसह सर्वांना अमानुषपणे मारत.कधीकधी लहानपणीच घरातून पळून जावे वाटे पण तीच्यावर आईचे एवढे सुंदर संस्कार आहेत की संघर्षातही कुटुंबवत्सल राहिली व  जगातील सर्वात श्रीमंत गायिका/संगीतकार होऊनही तिने वडीलांना साथ देणं सोडलं नाही.

पॉप स्टार रिहाना पासून खान्देशी कलावंतांना बरेच काही शिकण्यासारखे आहे

याउलट आपली खान्देशी सुप्रसिध्द लावणीकार युवती गौतमी पाटील हिने घरदार,गाव सोडून दिले व वडीलांची ओळखही रिहानाच्या पायाच्या धूळीएवढीही श्रीमंती नाही कल्याणीकडे या रेहानाच्या संघर्ष व यशोशिखराची कहाणीची ही किंचितशी झलक आजच्या संघर्ष करणाऱ्या तरुण तरुणींसाठीतर आहेच पण वैफल्यग्रस्त व व्यसनाच्या अहारी व आई-वडीलांनी आमच्यासाठी काय केलं अशा बेताल संततीसाठी आहे.काय तो बोध घ्यावा.

ज्याच्यात्याच्या कराव्यांत बळकट बुध्दी

जाताजाता,ज्या बार्बाडोसमध्ये शाळेपासून समाजापर्यंत अनन्वीत छळ झाला,त्या बार्बाडोसच्या एका रस्त्याला, राॕबिन रिहाना फेंटी हे नाव देण्यांत आले आहे.व सर्व छळ विसरुन येशू ख्रिस्ताचा Forget and forgive या आध्यात्मिक सिध्दांताप्रमाणे बार्बाडोस वासियांना माफ करुन सर्व विसरलीही आहे.अशा या आवलिया पाॕपगायिका ‘राॕबिन रिहाना फेंटी’ला सलाम


संकलन शब्दांकन मुक्तपत्रकार/लेखक/कवी मझिसु प्रा.मगन सुर्यवंशी.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *