धनत्रयोदशी च्या शुभेच्छा
ज्ञान हेच खरे धन। पुजा ज्ञान धनाची ह्या चला आत्मसात करु
सावित्रीच अवतरु
॥सर्व मंगल मांगल्ये॥
॥ज्ञान सर्वार्थ साधिके॥
॥क्रांतीज्योती सावित्री॥
॥ज्योतिर्मयी नमोस्तुते॥
धन त्रयोदशी आज
ज्ञानधन पुजा करु
सावित्रीच्या लेकी चला
माय सावित्रीला स्मरु॥धृ॥
काल्पनिक ज्ञानदेवी
सरस्वती ला विसरु
खरी ज्ञानदेवी साऊ
पुजा अर्चा तिची करु॥१॥
साऊ जाहली साक्षर
करु म्हणे शाळा सुरु
घरा घरातून लेकी
सुना साक्षर या करु॥२॥
अंधःकार अज्ञानाचा
चला दूर सार्या करु
नाही चूल आणि मूल
सारे विश्वच उध्दरु॥३॥
शिकून नी सवरुन
विश्व अवघे उध्दरु
घरा घरात एकेक
सावित्रीच अवतरु॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.