गाय गोर्ह्याची बारस

वसुबारस
वसुबारस

गाय गोर्ह्याची बारस

        चारोळी
गाय गोर्ह्याची बारस
दिन गोर्ह्याच्या तोर्याचा
दिन गोर्ह्याच्या तोर्याचा
        तोरा आणखी पोर्याचा॥

वसुबारस
वसुबारस

गाय गोर्ह्याची बारस

      गाय गोर्ह्याची बारस
पोर्यासाठी पुजतात
गाय गोर्ह्याची बारस
पोरीसाठी कोणताच
        नाही कसा उपवास॥धृ॥
गोर्ह्यासाठी पुजतात
गाय गोर्हाची बारस
वासरीच्या साठी नाही
       कशी कोणती बारस॥१॥
अंधश्रध्दा ही सारीच
दूर हवी सारायास
सया बहिनींनो हवी
       आता जाग यावयास॥२॥
यातूनच येते पहा
भ्रुण हत्या उदयास
प्रथा अनिष्ट अशा ह्या
       सर्व जाऊ द्या लयास॥३॥
वेळ आली जागण्याची
चला वाचवू स्त्रीत्वास
अबाधित ठेवू या ग
        आपुलिया अस्तित्वास॥४॥


निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.