कर मेहनत..…
हरलास काय । फक्त इतक्यात ।
तुझे पाय हात । शेष आहे ।।
खाण्यासाठी अन्न । राहायला घर ।
अनेकांना तर । हेही नाही ।।
दुःख कुणापुढे । मांडत बसून ।
स्वतःला त्रासून । घेऊ नको ।।
समस्येला तोड । नक्कीच असते ।
शोधावे लागते । प्रयत्नाने ।।
सत्कर्माची फळे । उशिरा मिळते ।
त्यागावे लागते । राग लोभ ।।
बसायचे नाही । कधीच रडत ।
कर मेहनत । निरंतर ।।
दुःख नसताना । सुख अर्थहीन ।
फळ कष्टाविन । गोड नाही ।।
सातत्य पाहिजे । आपल्या कामात ।
नको आरामात । दिस घालू ।।
अजू आयुष्याला । नको घालू व्यर्थ ।
टळेल अनर्थ । सत्य वाग ।।
©️®️शब्दसखा – अजय रमेश चव्हाण
तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
Posted inमराठी कविता (Marathi Kavita)
मराठी कविता कर मेहनत (Marathi Kavita)
![भारुड](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/03/boy-1546843_640.jpg)
भारुड