संगीत

संगीत
संगीत

संगीत

आपले संगीत महर्षी,
आदरणीय बिरारी आप्पा..
यांना समर्पित रचना… 🙏
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
             🙏🌹 संगीत 🌹🙏
————————————————-
जिथे ओंकाराचे मूळ
तोच संगीताचा पाया…
नाद   माधुर्यात   वसे
        शिवानंदी आदिमाया……….1

संगीताला भाळूनिया
मृत  कातडीही  बोलें…
नाच  निर्जीवांचा येथे
        रोज  सिनेमात  डोले……….2

घेई    तबल्यात   निद्रा  
ताल  जागविती   बोटे…
लागे  ब्रह्मानंदी  टाळी
        अशी माव आहे कोठे ?…….3

गौरी  शंकराची  उंची
गाठे  आरोहीचा गळा…
भीती  अवरोहा   दाटे
        मनी म्हणे  मागं वळा……….4

सांगे निजधर्म त्याला
शब्दालाही उंच न्यावे…
वादकांच्या मैफिलीत
        जिभेलाही काम द्यावे……….5

सूर, ताल,  ठेक्यासंगे
खुले गायकीची कळी…
भेट   पंचमची    घेतो
        शब्द किनरीच्या गळी……….6

पोर पाळण्याचं जाणे
जादू  संगीताची  थोर …
आई  अंगाईला   गाई
        हसे    खुद्दकन    पोर ………7

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
******************************
कवी…प्रकाश जी पाटील (पिंगळवाडे)
पिंगळवाडे ता.अंमळनेर..जि.जळगाव.
मो…9763911140
————————————————-

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *