पाऊस धारा
पाऊस धारा
मेघांनी व्यापला घाट
बरसल्या झरझर धारा
रान झाले ओलेचिंब
सोसाट्याचा सुटला वारा
खळखळ गात गाणी
वाहू लागले पाणी
हिरवीगार झाली सृष्टी
नटली नव नवरीवाणी
टपटप थेंब बरसता
थुईथुई मोर लागे नाचू
इवल्या इवल्या पातीवर
मोती लागले साचू
भरभरून वाहे नदी
तुडुंब भरली तळे
आज सजली धरती
फुलले शेत मळे
भरून नवचैतन्य
रोमांचित झाले अंग
आनंदला बळीराजा
मनात उठले तरंग
निसर्गाची किमया सारी
घडते क्षणात नवलाई
खेळू नकोस निसर्गाशी
संघर्षाची टाळ लढाई
विवेक पाटील
मालेगाव(नाशिक)