आपण खरच स्वतंत्र झालो का ?

आपण खरच स्वतंत्र झालो का ?
आपण खरच स्वतंत्र झालो का ?

आपण खरच स्वतंत्र झालो का ?

आपण खरच स्वतंत्र झालो का ? “

सर्व प्रथम सर्वांना भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा , आपल्याला हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही , या साठी आपल्या पूर्वजांनी आपल्या बलिदानाची आहुत्या स्वातंत्र्याच्या अग्नीकुंडात दिल्या आहेत , काही फाशीवर लटकले आहेत तर काहींना छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या आहेत

         भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यात सर्वच जातीधर्मातील जनतेचा सहभाग होता,  अगदी लहान मुले सुध्दा मागे नव्हती…  ज्यांना जसे जसे शक्य होते तसा त्यांनी सहभाग घेतला होता  , नुकतीच मिसुरडे फुटलेली तरुण मुले अगदी हसत हसत फासावर चढत होती आणि आपल्या बलिदानातून इतरांना प्रेरणा देत होती….  लाखो करोडो देशप्रेमींचे रक्त पिऊन अखेर तो पारतंत्र्याचा राक्षस तृप्त झाला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले…. देशाची फाळणी झाली आणि भारत मातेचा एक अवयव अक्षरश कापुन टाकण्यात आला.. किती वेदना झाल्या असतील भारतमातेला , ती जखम मात्र आज ही तशीच भळभळते आहे आणि ती तशीच राहणार आहे कारण पाकिस्तानातून जी अमृतसर एक्स्प्रेस आली ती जिवंत प्रवाश्यांची नव्हती ,तिच्यात होते लाखो हिंदुचे मृतदेह काही मरणासन्न अवस्थेत असलेली बालके  आणि असंख्य माताबहिणीचे विद्रूप केलेले शरीरे होती , काय मिळवले हो स्वातंत्र्य मिळवून आपल्याला ? गोरे इंग्रज जाऊन काळे इंग्रज आले , देशात भ्रष्टाचाराची बीजे रोवली गेली आणि त्यांचे आज वटवृक्ष झालेले आहेत,  कधीकाळी दोन पाच रुपयाची लाचेची किंमत होती ती आज करोडोंच्या रुपात घेतली जाते आणि ती ही अगदी अगदी निर्लज्ज पणे ….

                    देशाची फाळणी झाली ती धर्माच्या आधारावर,  पण तेव्हाचा उदारपणा आजही भारताला छळतो आहे…. आणि दहशतवादाच्या रूपाने भारताच्या प्रगतीला बाधक ठरतो आहे . धर्माच्या आधारावर फाळणी झाली , एक स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची निर्मीती झाली पण काही लोक इथेच राहिले आणि मला वाटते तीच सर्वात मोठी चुक ठरली…. आपला उदारमतवाद आपल्या बोकांडी बसून आज तो भस्मासुर आपल्याच जिवावर उठला आहे… भारताने त्यांना स्वीकारले,  आपलेसे केले पण….. ते लोक कधीच भारताचे  झाले नाहीत,  आज भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली पण त्या विशिष्ट धर्माने भारत आपला देश आहे हे अजूनही स्वीकारलेले नाही ही मोठी शोकांतिकाच आहे.
आणि हे लोक आपल्या कृतीतून दाखवून देत आहेत ,भारत पाकिस्तानचा क्रिकेट सामन्यात जर भारत हरला तर शहरातील एका विशिष्ट भागात दिवाळी सारखे फटाके फोडून जल्लोष केला जातो .रामनवमीच्या मिरवणुकीत दगडांचा वर्षाव केला जातो आणि दंगे घडवले जातात 


                  भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत एका
को-या पाटी सारखा होता , आपण एक आदर्श आचारसंहिता आखून एका सुदृढ आणि प्रगत देशाची आखणी करु शकलो असतो , त्यावेळेस सरदार वल्लभ भाई पटेल , लालबहादूर शास्त्री , डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर,  राजेंद्र प्रसाद या सारखे अनेक नेते होते आणि त्यांनी भारत एक आदर्श राष्ट्र व्हावे याची पायाभरणी पण केली….. पण त्यांचे वय आणि प्रयत्न अपुर्ण पडले , नवीन राष्ट्राच्या उभारणीचे काम हे सोपे नव्हते , अडचणी खुपच होत्या , साधने उपलब्ध नव्हती पण अश्याही परिस्थितीत डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर,  सरदार वल्लभभाई पटेल , लालबहादूर शास्त्री  या सारख्या अनेक नेत्यांनी देशाची पायाभरणी केली आणि प्रगतीचे एक एक पाऊल पुढे टाकत गेले , मात्र या नेत्यांच्या फळी नंतर पुढच्या पिढीचे नेते काहीसे या कामात कमी पडले , देशाच्या उभारणी सोबतच स्वार्थ पाहिला जाऊ लागला आणि घराणेशाहीला सुरुवात झाली…. माझ्या नंतर माझीच मुले माझ्या खुर्चीवर बसली पाहिजे आणि सत्ता फक्त माझ्याच हातात पाहिजे हेच पाहिले गेले….

        एकाच भारत देशात दोन धर्माचे कायदे अस्तित्वात आले , एकीकडे हिंदु ,ईसाई ,शीख आणि इतर धर्म आणि दुसरी कडे मुस्लिम धर्म,  मुस्लिम धर्माकडे फक्त एक वोट बँक म्हणून पाहिले गेले आणि त्याच्यासाठी सर्व बंधने तोडण्यात आली . हिंदु आणि इतर धर्माच्या लोकांसाठी ” हम दो हमारे दो ” हे बंधन घालण्यात आले आणि मुस्लिम धर्मासाठी ही अट शिथिल करण्यात आली  , या स्वार्थी राजकारण्यांनी मुस्लिम लोक अशिक्षित कसे राहतील हे पाहिले आणि त्यांची प्रगती त्यांनी रोखली , म्हणून आज मुस्लिम धर्मातील लोकांचे सुशिक्षितांचे प्रमाण खूपच कमी आहे , टक्केवारीत सांगायचे म्हटले तर फक्त 15 ते 20%लोकच या मधे उच्च शिक्षित आहेत आणि बाकीचे अशिक्षित किंवा कमी शिकलेले आहेत,  आणि याचा परिणाम त्याच्या विचार सरणीवर आणि राहणीमानावर झाला आहे.

                     मागच्याच आठवड्यातील घटना पहा  बांगलादेश मधे सत्ता परिवर्तन घडले त्यात आपल्या हिंदु बांधवांचा काही सबंध नसतांना त्यांना टार्गेट केले जात आहे आपले हिंदु बांधव तेथे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर जो अत्याचार होतो हे पाहुन असेच दिसते की आपल्या हिंदुधर्मा बद्दल किती व्देष आहे त्यांच्या मनात . भारतात लोकशाही आहे सर्वाना व्यक्ती स्वातंत्र्य आहे ,कोणालाही काहीही बोलण्याची मुभा आहे म्हणून भारताच्या संसदेत ” जय फिलीस्तान ” चे नारे देणारे सुरक्षित राहु शकतात,  पाकिस्तानचे झेंडे फडकावणारे शांत झोपु शकतात,  जर हेच चीन मधे झाले असते तर अश्यांना देशद्रोहाच्या कायद्याखाली तुरुंगात खितपत पडावे लागले असते किंवा फासावर लटकावण्यात आले असते… असो

        आपला भारत अजून ही पारतंत्र्यातच आहे आणि आता आपल्यावर इंग्रजाचे राज्य नाही तर राज्य आहे भ्रष्टाचाराचे , दहशतवादाचे  , धर्मांध प्रवृत्तीचे , जो हे राक्षस जिवंत आहेत तो पर्यंत आपण स्वातंत्र्य होऊच शकत नाही , यासाठी सर्वानी भारत आपला देश आहे आपली माता आहे हे सत्य स्वीकारुन या राक्षसांची नांगी ठेचली पाहिजे , आणि अश्या प्रवृत्तींना जागेवरच गाडले पाहिजे . ” हिंदु आक्रमक आहेत  ” हे जे म्हणतात त्यांनी एकदा भारतातील क्रिमिनल लिस्ट पाहिली पाहिजे आणि तिचा अभ्यास करुन छाती ठोक पणे कबुल केले पाहिजे कि करे  ” खरे आक्रमक , खरे क्रिमिनल कोण आहेत ते “

             तसे पाहिले असता हिंदुधर्म हा शांतता प्रिय धर्म आहे , सर्वांना आपल्या सामावून घेणारा , कोणाच्याही कामात आणि धर्मात दखल न देणारा धर्म आहे  . जगद्गुरू कृष्णाने देखील आपल्या शत्रुचे शंभर गुन्हे माफ केले होते मात्र सहनशीलतेची हद्द संपताच त्यांनी शत्रुचा नायनाट केला होता…. ही हद्द कोणीच ओलांडून जाऊ नये नाहीतर विनाश हा ठरलेलाच आहे आणि यात सर्वच होरपळून निघणार आहोत हे सांगण्याची गरजच नाही .

आपलाच मित्र
नितीन अहिरराव ( धुळे )

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *