कैकाडी बोली
Table of Contents
कैकाडी बोली
समाजमाध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार “कैकाडी ही भारताच्या महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश गुजरात तेलगणा केरळ मध्यप्रदेश झारखंड उत्तर प्रदेश एकूण १४ राज्यात आढळते एक भटकी विमुक्त जात आहे. ते मुळचे आंध्र प्रदेशचे / तामीळनाडूचे रहिवासी होते व नंतर कर्नाटक व महाराष्ट्र यांत आले असावेत. त्यांच्या भाषेत कानडी आणि तेलुगू शब्दांचा भरणा असतो.काहींच्या मते ते तमिळनाडूमधून आले असावेत. तमिळ भाषेत हात कापणारे आणि हाताने कापणारे, असा कैकाडीचा अर्थ होतो.तेथे त्यांना कोरवा म्हणतात.
मध्य महाराष्ट्रात जालना,औरंगाबाद,बीड येथे त्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे, येथे दोन पोट जाती प्रामुख्याने आढळतात त्यात गावकैकाडी जे की शेतीसाठी / घरगुती कामासाठी लागणारे टोपल्या (डाल) धान्य साठवण्यासाठी कणींग इ. विणण्याचे काम करतात असत हा व्यवसाय आधुनिकीकरणाच्या काळात पूर्ण पणे बंद झाला असल्याने हे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. या पोट जातीत त्यांची नावे जाधव गायकवाड अशी आहेत.
यांच्या मध्ये शिक्षणाचे प्रमाण हे चांगले आहे. त्या नंतर दुसरी पोट जात आहे धोंतले या मध्य त्यांची नावे आहेत पवार, जाधव, गायकवाड. माने यांचा व्यवसाय वराह पालन इ. होता, परंतु आता हळू हळू शैक्षणिक प्रगती होत असल्याने पूर्वीचे परंपरागत व्यवसाय सोडून हा समाज आता इतर व्यवसाय करत आहे. सातपाडी कवाडी मेंढरगुत्ती असे गोत्र आढळतात.
या समाजात पुढील पोटजाती आहेत -गाव कैकाडी,कोरवी, कोंचीकोरवी,पामलोर,धोंतले, कैजी, माकडवाले, उर कैकाडी, वाईवसे या त्यांच्यात नऊ पोट जाती आहेत.यांपैकी महाराष्ट्रात गाव कैकाडी ऊर्फ कोरवा, पाल्मोर ऊर्फ धुंताळे व माकडवाले यांच्या तीन पोट जाती आढळतात.गावात राहून आपला पूर्वापार टोपली विणण्याचा धंदा करणाऱ्या कैकाड्यांना गाव कैकाडी म्हणतात.पाल्मोर गारूड्याप्रमाणे सापांचा खेळ करून उदरनिर्वाह करतात. कुंची कोरवा जातीचे लोक विक्रीसाठी कुंचले वा कुंची तयार करतात. १९६१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात त्यांची लोकसंख्या सु. ५०,००० पर्यंत होती.त्यांच्या कुळींची नावे प्रामुख्याने जाधव,
गायकवाड,पवार,माने,मधवंत, काळे, कत्राळे वगैरे आहेत. त्यांच्या भाषेला कैकाडी अथवा कुलू म्हणतात.”
बहुतेक कैकाडी हिंदू आहेत. त्यांच्या प्रमुख देवता तुळजाभवानी, खंडोबा,बहिरोबा, मरीआई,तुकाई, गणपती, यमाई या होत. तसेच त्यांच्यातील प्रत्येक कुटुंबात जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी, सोनारीचा बहिरोबा आणि मारुती यांची पूजा केली जाते.आळंदी, जेजुरी, सोनारी आणि पंढरपूर ही त्यांची तीर्थस्थाने होत.

कैकाडी बोलीचा नमुना
कैकाडी बोलीचा नमुना-
कैकाडी समाजाची बोली भाषा वेगळी आहे.त्यांची स्वतःची सांकेतिक भाषा वेगळी आहे. त्या भाषेत तेलगू,कन्नड,केरळा, तामिळ असा मिश्र भाषेचा संग्रह आहे.या भाषेला लिपी नाही. म्हणूनच तिला सांकेतिक भाषा म्हणतात.प्रत्येक जिल्हयावर भाषातीच,पण उच्चार वेगवेगळे, काही ठिकाणी तेलगू भाषेचा प्रभावःतर काही ठिकाणी कन्नड (कर्नाटक) भाषेचा प्रभावआहे.
भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षणाच्या निमित्ताने अविनाश गायकवाड व प्रमोद जाथध यांनी या कैकाडी बोलीवर अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे.”राजु थोडा वेल गप्प खायाग आन् नामरी सचारस्याक सुंकर येचाकर मामुंक सल्लाळ.”मामा नान् हुगाकी आन् लेखक बनीस्क वाराकी” हना संदी राजु हुगाक राजु लाव केंच्युगा. लावं वाचीसीन कांडी आतन्क लाव ज्ञान मिळीसाक.
आद नल्ला कादंबऱ्या लिव्हीसाक. वंड कांदबरीक यात्नक राष्ट्रीय बक्षीस मिळीसाक राजुनाद राष्ट्रपती आतन्व कयुटा सत्कार आगाक. आतना एकनु दुनियातुई पिर आगाक.आन् राजु मामुना उर्क वाराक प्रयत्न येचुंड शेंदच काटनी प्रयत्नाद फळ संच.”याचा मराठी अर्थ असा-“राजू गप्प झाला. रात्रभर विचार करत बसला आणि सकाळी उठल्यावर मामाला म्हणाला,”मामा, मी जातो आणि लेखक बनून माघारी येतो.”असे म्हणून राजू निघून गेला. खूप शिकला.
खूप वाचनाने त्याच्या ज्ञानात भर पडली.त्याने खूप कादंबऱ्या लिहिल्या.त्याच्या एका कादंबरीला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचा सत्कार झाला.सर्व देशात त्याचे नाव झाले.राजू मामांच्या गावी आला.प्रयत्न केल्याने फळ अवश्य मिळते.”(अविनाश गायकवाड, मु.पो.ता. बारामती, जि. पुणे)
कैकाडी -काही शब्द
कैकाडी -काही शब्द
मराठीतील ‘मी’ला कैकाडी बोलीत’ना’ म्हणतात…तर तुम्ही या शब्दासाठी ‘निंगा’हा शब्द आहे. आद-काय, ह्यांट-कोठे, नंगा-आम्ही,यद-कोण,ईमा- हे’ वांदीऊ-येणे, यतुंगराद- घेणे, यतांडराद-आणणे,उसुडवाराद- सोडणे,गांरू -वडील,गंम्मा-आई, घंण्टू-मुलगा, तांशी-बहिण, सुकर- सकाळ, मेंदयान- दुपार. पांढरा या रंगाला ‘वळांद’ तर ‘काळा’ म्हणजे खरताद्,महाराष्ट्रातील कैकाडी समाजात वार व माहिने याना मराठी प्रमाणेच शब्द आहेत.कैक-हात,थाल्ला -डोके,
थाल्ला-डोके, मगरगा-कैस, कालगा-पाय,वंड- एक,रंड-दोन, मुड- तीन,,नाल- चार. ‘कुडकिराद त्याणी’ म्हणजे ‘पिण्याचे पाणी’ व पावसाचे पाणी म्हणजे ‘ ‘माग त्याणी’..(संदर्भ – भा. भा. सर्वेक्षण -मराठी,पृ. ५५९,६०)
अशा प्रकारे ज्या अनेक बोली बोलल्या जातात त्या आधुनिक काळात झपाट्याने मौखिकदृष्टीने संपत आहेत. नव्या शैक्षणिक धोरणात या बोलींच्या अस्तित्व व संवर्धनासाठी काही प्रयत्न झाले पाहिजेत. बोली ही त्या-त्या समाजाची नुसती एक ओळख नसते तर हजारो वर्षापासून ते शब्द म्हणजे सामाजिक,सांस्कृतिक सांचित असते बोलीतील शब्दांचा आपण ये परिचय करून घेत आहोत .पण ही पहिली पायरी झाली. एकदा शब्द कसा तयार झाला ?यामागची कारणे शोधली पाहिजेत, म्हणजे संबंधित बोली भाषकांच्या संदर्भात अधिक माहिती उपलब्ध होईल. (संदर्भ -भारतीय भाषांचे भाषिक सर्वेक्षण,पद्मगंधा,प्रका.पुणे,
पृ.५६०)