आषाढी एकादशी
एकादशी सीताफळात पांडुरंग वसे
नानाभाऊ माळी
आज आषाढी एकादशी! देवशयनी एकादशी! पंढरपूर यात्रा! भक्तीचा जलकुंभ भरून! अमृत भरून श्रद्धा वाहते आहे! ढग अंधारून आले आहेत! जलाभिषेकाची तयारी सुरु आहे! आज सर्वत्र आनंदाची उधळण होते आहे! भक्तीच्या गाभाऱ्यात बसून पांडुरंगासं मन मंदिरी ओढून घेण्याचा आजचा हा अवीट सोहळा आहे!
नजरेत देव बसला आहे! हृदयी देव बसला आहे! निसर्ग फुलला आहे! युगेयुगे विटेवरी उभा पांडुरंगाची यात्रा आहे! कानी, मनी, हृदयी, मुखे माझा पांडुरंग बसला आहे! जय हरी माऊलीचा गजर होत आहे! टाळ मृदूंग, वीणा स्वर आराधनेत दंग आहेत! पांढरीच्या राजानें भजन, कीर्तनात दंग केले आहे! वारी, दिंडी पालखी या अंतरीच्या भावगर्भात मन ध्यानी लागलं आहे!
आज एकादशी दिवशी माझा पांडुरंग दर्शन देत प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण करीत आहे! आज पंढरपूर भक्तीसागरात चिंब भिजत असतांना आम्ही पंढरपूरी जाऊ शकलो नाही! अंतरीचा विठोबा सर्वत्र दर्शन देत आहे! आज आमच्या छोट्याशा घरी पांडुरंग दर्शन देत आहे! घर गल्ली बोळात छोटंसं आहे! आज एकादशी दिवशी पांडुरंग दर्शन देत आहे! घरच्या छोट्याशा टेरेसवर दोन वर्षांपूर्वी सीताफळाच झाडं कुठून जगलं माहीत नाही! मी म्हणतो साक्षात श्री.विठ्ठलानें सीताफळ लावले असावे! आम्ही पंढरपूरी जाऊ शकलो नाही!
आज एकादशीचा उपवास! अन साक्षात आमच्या टेरेसवरील सीताफळाच्या झाडाला ३० ते ३५ सीताफळे लागली होती! आज पहाटे उठलो अंघोळी नंतर विठ्ठल नामात गुंग होतो! टेरेसवरती उगवत्या सूर्य नारायणाच्या दर्शनासाठी गेलो! ढगांच्या दाट पडद्यापलीकडे सूर्यदेव होता! पावसाचा एखादा थेंब मन प्रसन्न करीत होता! पूर्व दिशेला नतमस्तक होत दर्शन घेतलं अन फुलांच्या झाडावरून ममतेने हात फिरवत असतांना सीताफळाच्या झाडाजवळी गेलो! सिताफळ हस्तस्पर्शाने पाहात होतो! सुखावत होतो! मी आश्चर्यचकित झालो! सीताफळं लदलदलेल्या झाडावर ३० ते ३५ सीताफळापैकी ४ सीताफळ झाडावरच पिकलेलीं होती!
आनंद क्षणिक असूद्यातं! आनंद तो आनंदचं असतो! मी लहान मुलासारखी टुणकण उडी मारली! मी पांडुरंगाच्या अंगाखांद्यावर खेळणारा भक्त समजू लागलो! हे फळ त्यानेचं दिलं होतं! आज एकादशी दिवशी आताचं दिलं आहे! मी लहान मुलासारखा खाली पळत गेलो! घरच्यांना ही गोड वंचना केली! घरात सकाळी देवाची आरती सुरु होती! आरती झाली अन सर्वचं टेरेसवर पळत आलो! चारही पिकलेले सीताफळं तोडली अन पांडुरंगा चरणी ठेवली!
श्री विठ्ठल कनाकणात आहे! माझा विठ्ठल आज एकादशी दिवशी माझ्या टेरेसवर येऊन सीताफळरुपी दर्शन देत होता! माझी भक्तीची वार्ता मीचं पंढरपूरी कळवतो आहे,
“लसून कांदा मुळा भाजी
अवघी विठायी झाली माझी!
सिताफळ लाविले देवा
आम्हा फळं देतो तुचं देवा!
तूज ठेवीयेले अंतःकारणी
झाली एकादशी सत्कारणी!
देतो टेरेसवरती फळंझाडं
भक्तांचे तू करितो लाड!
तुझे दर्शन ठायी ठायी देवा
होई गोड सीताफळ मेवा!
कांदा मुळा भाजी फळं
तुझा उघडीला दर्शन नळ!
सीताफळं हे रसाळ गोमटी
त्यात विठ्ठल भरी अमृतामंटी!
दूर पंढरपूरी उभा पांडुरंग
सावता मळ्यात होई दंग!
मी आज सकाळी साडे सहा वाजता विठ्ठल नामात दंग झालो होतो! मनचक्षुनें हरीदर्शन घेत राहिलो! हरीने दिलेले सीताफळ पाहात राहिलो! ही किमया आषाढी एकादशीचीं आहे!
रामकृष्ण हरी माऊली!
नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो. नं-९९२३०७६५००, ७५८८२२९५४६
दिनांक-१७ जुलै २०२४ (आषाढी एकादशी)