आषाढी एकादशीनिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशीनिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीनिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशीनिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा

“वारकरी”

पंढरीच्या मार्गे

। जाई वारकरी,
भेटे वाटेवरी । मायबाप ।।१।।
वेळ,हवा पाणी । बाधेना गगन,
तो सर्व बघेन? । आपोआप ।।२।।
मूर्ख तोच नसे । चाले मार्गावरी,
भेटेल तो हरी । चुपचाप ।।३।।
निःसंकोच मागा । होऊनी निर्भय,
नाही हयगय । याचकांना ।।४।।
पांडुरंगा द्वारी । उभा क्षणभरी,
प्रकटेल हरी । एकाएक ।।५।।
आषाढी,कार्तिकी । पंढरीची वारी,
जावे भीमातीरी । आपसूक ।।६।।
गळ्यात तुळस । व्रत एकादशी,
व्हावे दास दासी । सावळ्याचे ।।७।।
वारी जन्मोजन्मी । करून चुकवा,
लक्ष चौऱ्यांशीवा । येरझारा ।।८।।
सर्वंच आयुष्य । न काढता घरी,
जावे हरी द्वारी । हयातीत ।।९।!
भागवताध्याय । न अतिशयोक्ती,
करी हरी भक्ती । वारकरी ।।१०।।
भक्ती आधारित । पंढरीची वारी,
करी वारकरी । विठ्ठलाची ।।११।।

आषाढी एकादशीनिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीनिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा

(से.नि.प्रा.प्रकाश बिरारी.खमताणे,सटाणा)
{मोबाईल नं.- 9403307521}

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *