वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
तुझ्याभोवती जरी शेकडो गझलतरुंची वर्दळ आहे
गिरीसारखा असून मित्रा तू हृदयाने निर्मळ आहे..!
प्रिय मित्रवर्य,अपंग कल्याण केंद्र,सटाणा येथील अभ्यासू संचालक,अष्टपैलू प्रशासक,उत्कृष्ट गझलकार,अष्टाक्षरीकार,कवी व फर्डे वक्ते,सामाजिक कार्यकर्ते,सर्वांगसुंदर सांस्कृतिक कार्यक्रमांचे अभ्यासू नियोजक,विनम्र,स्नेहवर्ती व्यक्तिमत्त्व,साहित्यस्नेही,मराठी व अहिराणी साहित्य पंढरीचे सच्चे वारकरी,खांदेश साहित्य संघाचे नाशिक जिल्हा संघटक..
हृदयप्रिय मित्र आपणांस वाढदिवसाच्या आभाळपंखी हार्दिक शुभेच्छा ! मित्रवर्य आपणांस उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
कवी श्री.देवदत्त बोरसे(सुगंधानुज)