पाऊस माझा ध्यास
‘पाऊस’माझा ध्यास.
बरे झाले वरुण देवा,
ऐकला माझा धावा,
पाठविला माझ्या गावा,
आनंदे पाऊस सांगावा.
पाऊस माझा अंतीम ध्यास,
मर्म बंधातला ठेवा आणि गोड कांस.१
ऐकलेस ‘आरव’ तू पाऊस,
डोंबिवलीत बसून हाक ऐकलीस!
बळी बाप करीत होता पाऊस,पाऊस,
आता असाच घालत रहा धूडगूस.
पाऊस माझा अंतीम ध्यास,
मर्म बंधातला ठेवा आणि गोड कांस.२
केलेली धूळपेरणी बदलेल कूस,
फुटता हिरवांकुर बियांना शिवार खूष,
गोठ्यागोठ्यात बांधलेले पशुधन,
अंतरी स्फूरेल तयांच्या पाचूगान.
पाऊस माझा अंतीम ध्यास,
मर्म बंधातला ठेवा आणि गोड कांस.३
रोपवाटीका नवरीगत सजतील,
हर्ष मनी दाटता पाऊस ऐकतील,
भगभगीत उन्हाने झाडे पिवळाललेली,
पाने सारी तयातील हिरवावून डोलतील.
पाऊस माझा अंतीम ध्यास,
मर्म बंधातला ठेवा आणि गोड कांस.४
धणीन सवे बळी बाप आनंदे नाचेल,
बालगोपालांना मस्त कवेत घेतील,
खगगणांचा चिवचिवाट ढगात घुमेल,
धरती माता हिरवा शालू नेसून मिरेल.
पाऊस माझा असेहो अंतिम ध्यास,
मर्मबंधातला ठेवा आणि गोड कांस. 5
पाऊसवेडा
मझिसु प्रा. मगन सुर्यवंशी