पांडुरंग मराठी अभंग
॥ पांडुरंग ॥
रिकामा गाभारा, सारे अचंबित.
खेळतो वारीत, पांडूरंग.
मिटते अंतर, भक्त आणि देव.
आता नाही भेव, संसाराचा.
एकदा करारे, भक्तीचा प्रयोग.
दु:खाचा नियोग, पंढरीत.
कैवल्याचे सार, बघा येते हाती.
दृढ होती नाती, जन्मोजन्मी.
विठ्ठल विश्वास, विठ्ठलच ध्यास.
विठठलच श्वास, जगण्याचा.
भ.ना.म्हणे आता, वाढावी ही भक्ती.
मिळावी ती मुक्ती, याची देही.
© प्रा. बी. एन. चौधरी.
देवरूप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
Pingback: वारकरी - मराठी