पाऊसाच्या कवीता देव तो वरूण
दिनांक २४/६/२४
विषय- चित्रलेखन
शीर्षक- देव तो वरूण
ओथंबले घन
करे पाणी-पाणी
शिवाराची सा-या
झाली अबादानी
न्हाहून निघाली
चिंब झाडीवेली
वाटेत गुराखी
थेंब अंगी झेली
दाटत्या वनात
कोसळती धारा
पर्ण हलवितो
गंधाळेल वारा
तृप्त झाली धरा
भागली तहान
वाहणारे पाट
सोसती गुमान
करतात मस्त्या
नद्या गुरमीत
वाहती तोडून
मर्यादेची रीत
मज पावसाळा
रूचतो अधिक
फुले बहरती
रंगाने कितीक
डोंगर माथ्याला
हिरवं वसण
डोळ्यात भरती
त्याच बी दिसण
दिमाखात उभा
झेलतो धारांना
पोटभर देतो
खायाला गुरांना
करे अभिषेक
निबिड वनाचा
त्यात दडलेल्या
किमती धनाचा
पावले नक्षत्र
मृगाचे भरून
पडला धुंदीत
देव तो वरूण
संतोष कपाले
रायगांव ता.लोणार सरोवर
मो. 9921132285