Varhadi Kavita
मुलतानी मिट्टी
येनं रे बा!
मुलतानी मिट्टी
बायको म्हंने मह्यासाठी
आना मुलतानी मिट्टी,
नायतन धरतो मी
तुमच्या संग कट्टी-!
मी म्हनो तशीच तू
बेजा सुप्पर दिसतं,
कायलेच तोंडाले
मातीगीती घासतं-!
ते म्हन्ये,तुमाले
सांगतो तीतलच करा,
जीतलं सांगतलं बायकोनं
तितलच आयकाव जरा-!
आनली म्या दुकानातुन
मुलतानची माती,
दिसभर भिजवून चेयऱ्याले
लावली बायकोनं राती-!
पानी प्याले जसा मी
उठलो भाऊ राती,
तीले पाऊन धडधड
करे माही छाती-!
भुतावानी केसई तिनं
मोकये होते सोळले,
कल्ला करत लेकरं तं
अरमान तिनं झोळले-!
पाह्यटीच चेयरा तीचा
झालता राजा कळक,
कवाळ उघळून निंघाली
आंगनात बेधळक-!
तीले पाऊन कुत्तळळे
अळ्ळावत भलकशे,
म्यॉव म्यॉव करत
मांजरबी हाशे-!
मी म्हनो,धूऊन टाक
चेयरा बिच्यारे तुह्या,
कामून अशी जीव तू
खावून राह्यली माह्या-!
ते म्हने,मुके राह्यना
कायले करता कल्ला?,
म्या तुमाले आजलोक
ईच्यारला काय सल्ला?-!
हात जोळले तीले
म्हतलं, बराबरस हाये तुह्यं,
चुकलं अशीन बिच्चारे
काहीतरी माह्यं-!
मंग तीले पटलं
गालातल्या गालात हासली,
माह्यापाशी वट्यावर यिऊन
खेटून मले बसली-!
सांगा म्हने,आता मी
तुमाले दिसतो कशी?-!,
मी म्हनो, ऐश्वर्या अन्
क्याटरीना दिसते तशी-!
आनूनस ठूवा म्हने
पाचेक किलो माती,
रोजस मी लावत जाईन
सब्बन झपल्यावर राती-!
दिनेश मोहरील, अकोला
8888045196
![Varhadi Kavita](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/06/img-20240623-wa0011281295445779548594931717-1024x1024.jpg)
येनं रे बा!
येनं रे बा!
रामराम हो दिनुबॉ!
रामराम!!
कामून उदाश्येल हा तुमी?
पानी राजा अर्धा जून सरला तरी नाई लेकाचं, कसस कराव कायजून! येनं रे बा!
यिन ना हो! त्याले
कायजी राह्यते!
हुम्म.. तुमाले काय हाये ? मले पेरन्याचं टेंशन हाये ईकळे, तुमाले मह्यना झाला का गड्डर हातातनी!
ही.. ही.. तसं काई नाई हो बा! पानीपाऊस सर्याईलेस पाह्यजे ना!
मले तं असं वाट्टे यवगेसभौ, वावरातनी सब्बल घिऊन जावाव अन् अभायात ऊळी मारून अभायाले भोकस पाळाव लेकाचं लय मोठं! मंग पाह्यजा कशी धार लागते धळधळ!
ही.. ही..! ते काय ईहीर खन्न्या ईतलं सोपी हाये काय? भलकाईस बोलता राजेहो, दम धरना जरसाक! येते ना!!
कवा? मसनात गवऱ्या गेल्यावर?
नाईनाहो! तुमी बेजास घाई करता बा! ही.. ही..!
मांगच्या साली तं ऊनायातनी पाऊस पळळा! औंदा पावसाया निंघून चाल्ला तरी थेंब नाई! मंग काय दिवईत येते काय बुहारा!
ही.. ही.. ही..!
बस्स… तुमी फगत दातस ईचकत जा!
बायको म्हने
बायको म्हने
बायको म्हने येक डरेस
आठ दिस घाला,
कपळे धू धू तुमचे
ईट मले आला-
कुकळे बी तुमी
गध्यावानी लोयता,
असं वाट्टे कुत्र्यावानी
मातीतच खेयता-
पॅन्टीतून निंघते
भलकसा मय,
कुरतं लगळून गोट्यावर
हाताले लागते कय-
पांढ्ढी बन्यान येकई डाग
करत नाई सईन,
अन् लूंगी तं झाली तुमची
ताळपत्रीची भईन-
धुनं धूधू कंबळ्ळं
गेलं माह्य वाकून,
असं वाट्टे सब्बन कपळे
द्याव नदीतनी फेकून-
म्या म्हतलं, तूले मी
मोगरी दिऊ काय आनून?,
ते म्हने, कायले मले
खिजोता तुमी जानून-!
मी म्हनो, कपळैसाठी
चांगलं नसते खेकसनं,
फाटतीन ना बॉ कपळे
बस्स कर आपटनं-!
ते म्हने, आनून द्या
मले वाशिंग मशिन,
मंगच मी खरं सांगतो
येकदम चूप बशीन-!