I C U
होते साथी!सात दिवस
… नानाभाऊ माळी कोण कुणाच्या साथी असतो कोण कुणाच्या माथी असतो जगणं मरणं सोबत घेऊनि साथी माथी खाती असतो! डोळ्यांनां या वेदना कळल्या काही होत्या पहिल्या वहिल्या भळभळ अंग सहत गेलें वेदना परक्या न राहिल्या!
दुःख समयी जे अश्रू पुसती
जवळी आपुल्या तेचं असती
असती जे हो सखे सोबती
रात्रंदिवस ते जागत असती! दिनांक १४ जून २०२४ रोजी आमचे एक नातेवाईक जीवन मरणाच्या दारी असतांना अचानक हॉस्पिटलच्या icu ला!Insentive Care Unit ला भरती केलं गेलं!मी तेथे डोळ्यासमोर सर्व काही घडतांना पाहात होतो!..... .... मनात सहज विचार आला होता!पेशंट कारखान्यातील "जॉब" असतो का ?हॉस्पिटल कारखाना असतो का ?....डॉक्टर कुशल तज्ञ असतात!आजारपणा नुसार माणसाचा जॉब रेट ठरत असतो का?कारखान्यात पैसा भरत राहायचं!दिलेला जॉब (पेशंट) तंदुरुस्त करून घरी नेतं राहायचं!
चुकून एखादा जॉब रिजेक्ट( Reject )होतो!तो जॉब रिपेरच्या बाहेर असतो!हातून सुटतो!हाती काहीही लागतं नाही!डॉक्टर सॉरी म्हणून संवेदना व्यक्त करतातं!भावना व्यक्त करतातं!जॉब पास न झाल्याचं दुःख डॉक्टरांना देखील होत असतं!शेवटी ईश्वरावर सोडून द्यावे लागते!डॉक्टर देखील माणुसचं असतो!जॉबकार्ड प्रमाणे रिजेक्ट जॉब ऍम्ब्युलन्समध्ये टाकून घरी पाठवला जातो!नातेवाईकांच्या स्वाधीन केला जातो!नातेवाईकांचा अंतःकरणातून हंबरडा फुटतो!डोळ्यात अश्रू येतं असतात!रडणं सुरु असतं!कोणाच्या घरचा आधार गेलेला असतो!कोणाचा बाप, पत्नी, पती, आई, वडील, भाऊ, बहिणी गेलेले असतात!हॉस्पिटल खरचं नकोसं वाटतं हो!
आमचाही एक पेशन्ट icu मध्ये होता!आम्ही रात्रंदिवस icu च्या दारासमोरच होतो! अचानक कानी पडतो,'ओ बाबा!तिथ झोपू नका!दिसतयनां दरवाज्यावर काय लिहलंयं ते!उठा तिथून!इमर्जन्सी पेशन्ट आलं आहे!'सेक्युरीटीचा आवाज कानी पडताचं आम्ही उठलो!...रात्रीचे साडे बारा वाजले असतील!आम्ही icu-अतिदक्षता विभागाच्या दरवाज्या समोरील फरशीवर चादर अंथरून झोप येईना, तरीही पडलो होतो!अचानक मेन गेटच्या बाहेरून ऍम्ब्युलन्सचां आवाज कानी पडला!हॉस्पिटलच्या इमरजन्सी वॉर्डमध्ये स्ट्रेचरवर एक पेशंट आणलं जात होतं!
आम्ही चादर उचलत लगबगीने उठलो!आम्ही बाजूला झालो तसा धावत पळत स्ट्रेचरवर पेशन्टला आत नेलं होत!ही अर्ध्या रात्रीची घटना होती!आमचं ही एक पेशन्ट icu मध्येचं होतं!पेशंट सोडून कुठे जाणारं होतो? कुठे झोपणार होतो आम्ही? अंधार रात्र,अंगावर पांघरून शहर झोपी गेलेलं असतं!गाढ झोपी गेलेलं असतं!गाव-शहरातील एखादा सिरीयस पेशंट हॉस्पिटलच्या आवारात येतो!ऍम्ब्युलन्सचा सायरन वाजत असतो!कर्मचारी पळत असतात, डॉक्टर पळत असतात, सिस्टर पळत असतात,वार्डबॉय पळत असतात!एक जीव वाचविण्यासाठी जीवाचं रान कित्येक जन असतात!पळतअसतात!
रात्रंदिवस शरीरिक,मानसिक आजारी रोगींच्यां सेवेत हॉस्पिटल जागत असतं!वेळेची सवड कोणालाचं नसते!वेळेचं घड्याळ हृदयातल्या ठोक्यावर फिरत असतं!डॉक्टर माणसातील देव असतात!दुःखीतांची सेवा,सुश्रुशा करीत असतात! रात्री-अपरात्री निरव शांतता असतें! ऍम्ब्युलन्स टुईं टुईं टुई आवाज करीतं हॉस्पिटल समोर येऊन थांबते!इमर्जन्सी वॉर्ड ऍक्टिव्ह होतो!धावपळ अन कृती सुरु होते!काही क्षणात पेशन्टला स्ट्रेचरवर घेतलं जातं!लगोलग ट्रीटमेंट सुरु होतें!इमरजन्सी icu वॉर्ड घड्याळाच्या ठोक्यावर कृती करीत असतं!जगणं- जगविण्याची ही धडपड असतें!डॉक्टर माणसांचा देव असतो!माणूस श्रद्धेवर जगत असतो!श्रद्धेला शरण जात असतो!
अतिदक्षता वॉर्ड सज्ज असतो!अत्याधुनिक सर्व यंत्रणेसह डॉक्टर,सिस्टर तत्पर असतात!पेशंटच्या शरीरातीतून बाहेर पडू पाहणाऱ्या जीवास ओढून,शरीरात ढकलण्यासाठीही टिम जीव ओतीत असतें!काळजी घेत हालचाल करीत असतात!पेशन्टचा जीव वाचवण्यासाठी कार्यमग्न असतात!बाहेर पेशंटचे नातेवाईक डोळ्यात देव आणून बसलेले असतात!अतिदक्षता वॉर्डबाहेर गर्दी असतें!रेड लाईट सुरु असतो!आत जाण्यास सक्त मनाई असतें!असे अनेक पेशंट येतं असतातं!अशाचं icu वॉर्डात आमचाही एक पेशंट होता!अप
रात्री icu च्या समोरील फरशीवर चादर टाकून आम्ही पडलो होतो!थोडे डोळे लागले होते म्हणा...अचानक धावपळ होतें!ट्रेचर पळत असतं!पेशन्ट ट्रेचरवर असतो!श्वास पळत असतात!जीवन मरणाच्या रेषेशी खेळ सुरु होतो!कधी यम दारात येऊन यशस्वी होतो!तर कधी यमास खाली हात माघारी फिरावं लागतं!
एक नाही!दोन नाही!तब्ब्ल चार दिवस आम्ही अतिदक्षता विभागा समोर होतो!गोधडी टाकून झोपत होतो!आमचा पेशंट आत होता!आम्ही बाहेर होतो!आत-बाहेरील विश्व भिन्न होतं!एक काळजीत होतं!दुसरं कृती करीत होतं!आम्ही अर्धवट झोपेच्या डुलकीत होतो!वेळी अवेळी पेशंट येत होतें!इमर्जन्सी पेशंट येतं होतें!जीवाच्या आकांताने रडणारे नातेवाईक उघड्या डोळ्यांनी पाहतं होतो!येणारा पेशंट कधी हार्ट अटॅकचा होता!कधी ऍक्सीडेन्टचा होता!
एखादा पाण्यात बुडाल्याचा होता!ऐके दिवशी तर फाशी घेतलेला पेशंट रात्री १० वाजता आला होता!ऍम्ब्युलन्सच्या पाठीमागून पन्नास एक माणसं पळत आली होती!अतिदक्षता वार्डसमोर गर्दी करून उभी होती!फास्ट ट्रीटमेंट सुरु होती!नातेवाईक रडत होतें!धावपळ करून औषधं आणून देत होतें!एखाद्याचं नशीब बलत्तर असतं! त्या पेशंटच्या आयुष्याची दोरी दणकट होती!तयारीनीशी आलेल्या यम देवास खाली हात जावं लागलं असावं!तो पेशंट आज पावेतो जीवंत होता!
अति गंभीर आजाराचें पेशंट येतं होती!ऍम्ब्युलन्सचां आवाज कानी पडला की पळापळ,धावाधावं सुरु व्हायची!पेशंट icu तं जायचा!आम्ही डोळे उघडून पाहात होतो!आत काय चालू असेल? असं करतं होतो!माणसाला कितीतरी शरीरिक वेदना असतात, आजार असतात!अचानक उसळी घेतात!थेट हॉस्पिटलच्या icu तं यावं लागतं!मरणाच्या दाराशी येऊन पोहचत असतो!माणूस रोगांनीं धनिक आहे!तरीही अल्पायुष्यात ही गर्वाने फुगत असतो!इर्षेनें खंगत असतो!जळत असतो!रेड्यावर स्वार होऊन यमदेव येत असतो!हळूच उचलून घेऊन जातो!मातीचा देह,जड देह मागे ठेवून जातो!सर्व येथेच सोडून निघून जाणारा माणूस सोबत काय घेऊन जातो?
या आठ दिवसांत याचं डोळ्यांनी मरण पाहिले आम्ही!दुःख पाहिले आम्ही!जगणं पाहिले!डॉक्टर, सिस्टर सर्वचं पेशंटला जीवनदान देण्यासाठी जीवाचं रान करतांना उघड्या डोळ्यांनी पाहिले आम्ही!प्रत्येकाला हॉस्पिटल नकोसं वाटतं पण व्याधी दुरुस्तीचं केंद्र असतं!शारीरिक, मानसिक आजारपण नकोसं वाटतं! आपल्या हाती काहीही नसतं!नको ते वाढून ठेवलेंलं असतं!
आजारपणाच आमंत्रण न सांगताही मिळत असतं!आपण पराधीन आहोत का? आमचाही एक नातेवाईक icu त होता!डोळे पाहात होते!हृदय धडकत होतं!कान ऐकत होते!हॉस्पिटलचा अतिदक्षता विभाग सर्व सहकार्यांनीशी सज्ज होते!पेशंटच्या शरीरातील इंजेकशनच्या सुया आयुष्य अमृत पुरवत होत्या!जीवदानासाठी ही लढाई होती!आम्ही आठ दिवस ही लढाई पाहात होतो!खरचं जगणं लढाई असते का?आजारपण नको असतं का?या आठ दिवसात जगणं कळलं आहे!डोळे सर्व पाहून समजले आहे!
आताच पेशंट डिश्चार्ज झाला आहे!
नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२१ जून २०२४
(योग दिवस)