Marathi lavani लावणी

Marathi lavani
Marathi lavani

Marathi lavani लावणी

लावणी

गुढग्याला बाशिंग बांधून…हो..
किती मारणार गड्या तु शिट्या….
माझ्या नवतीला आलं तुफान…
कुणा कुणाला मारू रे मिठ्या….//धृ//

संपलं सोळा नी मातलं सतरा
दिसें आईला खतरा…
काया ज्वानीनं ताब्यात घेतली
बघाया जमली जतरा…
माझा सख्या आहे खान्देशी…
तो खेळतो दांडू नं इट्या……….//1//

धन नवतीचं आवळून बांधते
चोळी उसवते मी सांधते…
भामटी नजर घाली येऱझारा
गाठ चोळीची देते पहारा…
नंदुरबारला हाये तमाशा…
येशील का धुळ्याच्या पठ्ठया…..//2//

तुमच्या शिट्यांचा आदर करते
अदबीनं कमरेत वाकते…
डाव्या डोळ्यांची पापणी फडकली
काळजात आग भडकली…
तुमचा पत्ता हो सांगा मजला…
पाठवीन प्रेमानं चिठ्या………..//3//

कवी…प्रकाश जी पाटील (पिंगळवाडे)
गायिका… उत्तरा केळकर
संगीत… जे. आत्माराम
चित्रपट… चितान्ग  (ठिणगी)

Marathi lavani
Marathi lavani

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *