अहिल्याई
——हाती अज्ञान उरले—–
अहिल्याई ने बांधिले
जागोजागी देवालये
आम्हासाठी हवी पण
आज शाळा विद्यालये॥धृ॥
भटा बामनांची आता
पुरी भरलीत पोटे
आम्ही राहिलो अज्ञानी
नद्या नालीतले गोटे॥१॥
अहिल्याई ने बांधिले
विहिरीही जलाशये
शुष्क जाहलीत सारी
आता हवी वृक्षालये॥२॥
मूळ निवासी आम्ही हो
भट बाहेरुन आले
श्रम आमुचे घेऊनी
देव आमुचे हे झाले॥३॥
यांच्या भाकड कथांनी
अन् आम्हास घेरले
आम्हा हाती केवळच
मग अज्ञान उरले॥४॥
–निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक:-९३७१९०२३०३.
=_=_=_=_=_=_=_=_=_=_=_=_=_=_=
