प्रचार संपला
प्रचार संपला….
मतदान झालं…..
जनतेच्या सेवकांचं…
काम हि संपलं….
विकास घरी गेला…
भक्त निवांत झोपला…
मशालीची आग विझली..
दांडाच हाती राहिला…..
ईंजिन यार्डात गेलं…
घड्याळ सर्विसिंगला टाकलं..
धनुष्य मधेच तुटलं….
पंजाने कपाळ बडवलं….
कमळ वाट बघतय…
चिखलात ऊमलण्याची..
मनात धाक धुक त्याच्या…
चारशे पार या तडीपार होण्याची..
बसलेत सगळे हिशेब करत…
पासबूक-अकाउंट चेक करत..
कीती वाटले..कीती मिळाले..?
खोक्यांची बजा-बाकी करत….
आपण मात्र घेतल भांडून..भांडून..
अगदी हमरी तूमरीवर येवून…
नाती- मैत्रीत दूरावा आणून….
एकमेकांची मनं दूखवून….
कोण कुणाचा नाही या जगती…
नेते- राजकारण स्वार्थासाठी..
संकट समई मित्रच भोवती…
विसरू नये मैत्री चिरंजीवी…!
