सिंहासन
हवी होती ना नेताजी
खुर्ची तुम्हाला सोनेरी
पाच वर्ष घ्या सांभाळा
सिंहासन हे काटेरी..!
वेडा नाही हो साहेब
भारताचा मतदाता
भ्रष्ट्राचारी नेते त्याने
घरी बसविले आता..!
देश मागतो विकास
तुम्ही दिली नोटबंदी
नोटा बदलण्यासाठी
किती केले जायबंदी..!
डिजिटल भारतात
कुठे आहे रोजगार ?
डिग्र्या घेऊन वाढले
लाखो युवक बेकार..!
कर्जमाफी योजनेत
केले उद्योगी आबाद
कणा असून देशाचा
बळी केला बरबाद..!
ओस पडली वचने
खोटे तुमचे संकल्प
पूर्ण कुठे केले सांगा
नद्या जोडणी प्रकल्प..!
हिंदु मुस्लीम दलित
आम्ही सारे भाऊ-भाऊ
देत विखारी भाषणे
नका तुम्ही भडकाऊ..!
पक्ष असेल तुमचा
घरी तुमच्या महान
श्रेष्ठ आम्हा पक्षांपेक्षा
भारतीय संविधान..!
कवी-देवदत्त बोरसे
(सुगंधानुज)
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६ ९५.