मै सावरकर नही

सावरकर
सावरकर

मै सावरकर नही

मै सावरकर नही “
मै सावरकर नही , मै माफी नही मांगुगा
अरे हो , तुझी लायकीच नाही बघ
सोपे नाही रे सावरकर होणे
त्यासाठी लोखंडाची आभुषणे अंगावर मिरवावी लागतात
चाबकाचे फटकारे छातीवर झेलावे लागतात
पाठीची सालपटे काढावी लागतात
आणि कोंड्याचे मांडे खावे लागतात
तेव्हा कुठे सावरकर जन्माला येतात

देशप्रेमासाठी शुध्द रक्त नसात असावे लागते
जानवे घालुन, गंगेत न्हावुन कोणी हिंदु होत नसते रे
त्यासाठी शुध्द बीजाचे शुक्राणू हवे असतात
घोडी आणि गाढव यांच्या पासुन खेचरच जन्माला येतात
सिंहाला जन्म द्यायला सिंहीणीच लागते
तेव्हा कुठे दुनिया सारी सिंहापुढे झुकते

माफी मागण्यात काय गैर आहे
माफी मागण्यात पण मोठेपणा,  सामंजस्य लागते
लांब उडी मारण्यासाठी मागुनच धावत यावे लागते
काळाची पाऊले ओळखून माघार घ्यावी लागते
श्री कृष्णाला पण रणछोडदास म्हणुन संबोधले जाते
छत्रपती शिवाजीमहाराजांनी देखील तह केले होते
थोडेसे माघारी जाऊन त्यांनी मुगलांवर प्रहार केले होते

मंदबुद्धी  तुला आटा कश्यात मोजतात हे कळत नाही
भ्रष्ट्र तुझी बुध्दी तुझ्या पूर्वजांच्या कृत्याकडे कशी वळत नाही
‘ गरीबी हटाव ‘ चा नारा देत तुझ्या तीन पिढ्या खपल्या
प्रेताच्या टाळु वरचे लोणी खाऊन तुम्ही किती करोडोच्या नोटा लाटल्या

नितीन अहिरराव धुळे

मै सावरकर नही
सावरकर
स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट
स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट