सरी आते बरसू दे
सरी आते बरसू दे
पड पान्या बिगी बिगी
नको तरसावू आते
व्हवू देरे सुगी सुगी
मन नाचू दे आनंदे
डोये लागले आभायी
येऊ देरे तुले दया
पाश सोड सावकारी
कर मोक्या मना गया
लेक आली लगनाले
घरधनी तुम्ही ऐका
कशी जोडू सोयरीक
नही गाठले तो पैका
कोरड्याच आडाथून
काये कातळ हासते
नही पेवाले ते पानी
प्रान कंठाशी आनते
भूखी माही चिल्लीपिल्ली
माह्य कायीज कापतं
मन माह्य करतं रे
घ्यावी फाशी शिवारात
सरी आते बरसू दे
कर गर्जना आभायी
पिकू दे शेतशिवार
भरू देरे माह्यी झोयी
डाँ. शैलजा करोडे ©®
नेरूळ नवी मुंबई
मो.9764808391