गोजीरा श्रावण आला #marathikavita latest

श्रावण
श्रावण

गोजीरा श्रावण आला #marathikavita latest

गोड गोजीरा श्रावण आला
*************************
गोड गोजीरा श्रावण आला
आला वसुंधरेचा सण
श्रावणाच्या सुंदरतेने
शहारुन गेले मन

सरसर बरसल्या पाऊस धारा
गंधाळली माती
आनंदाने घरंगळत आले
दवबिंदूचे मोती

सैरभैर झालीत पाखरे
मैना गाते मंजूळ गाणी
दऱ्याखोऱ्यातून वाहते
खळखळ पाणी

पाना फुलांच्या गळाभेटीने
गंध फुलांचा दरवळतो
निळ्या निळ्या आभाळातून
इंद्रधनु डोकावून पहातो

उभा डोंगर पांघरूण घेतो
शालू हिरवा हिरवा
हळुवार अलवार मिठीत घेतो
गोड गुलाबी गारवा

गर्द गडद धुक्यातही
झाडेझुडपे लाडावतात
खेळता खेळता लता लतिका
एकमेकास छेडतात

हिरव्या हिरव्या गालीच्यावर
श्रावण हळूच अवतरतो
फुलवून पिसारा मोर कसा
थुईथुई नाचतो

रूबाब देखणा श्रावणाचा
डोळेभरून पाहवा
रंगबेरंगी आसमंत सारा
कवेत धरुन घ्यावा

संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)
९५७९११३५४७
९४२२८९२६१८

श्रावण
श्रावण

Shravan Marathi Kavita Sangrah श्रावण कविता मराठी

Pavsachi Kavita