शेतकरी राजा चे काळीज राज्या सारखे

शेतकरी राजा
शेतकरी राजा

शेतकरी राजा चे काळीज राज्या सारखे

शेतकर्‍याचे काळीज राज्याचेच

      ——©MKभामरेबापु

शेतकर्‍याला “राजा” ही उपाधी देवुन आपण मोकळे होतो.
परंतु या राज्याला किती अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड द्यावे लागते हे तो राजाच जाणे.

राब राब राबणारा हा शेतकरी,हजारो रुपयांना काळ्या मातीत पेहरतो.कधी कोरडा दुष्काळ,कधी ओला दुष्काळ,
कधी बोगस बियाने,कधी बोगस खते, कधी अवकळी वादळ,पाऊस तर कधी व्यापार्‍यांची मनमानी.
तरीही हा राजा खचत नाही.

या राज्याचं काळीज खरच राज्यासारखं विशालच असते.
तुम्ही शेतात गेलात तर हा राजा व शेती माऊली तुम्हाला काही न काही खायाला तरी देतील व वानोळा म्हणुन बांधुनही देतील.

आज याची अनुभुती आली.नरडाण्याला कामानिमित्त गेलो असता,शास्रीय पध्दतीने शेती करणारे व नुकतेच कृषी भुषण पुरस्काराने सन्मानित झालेले आमचे मित्र लिलाधर दुसाने सोनार  यांना मी दिसलो.

सध्याच्या युगात माणुस माणसाला पारखा झाल्याने काना डोळा करत कटीफिकेशन करतो.
पण
हा लिलाधर नावाचा शेतकरी राजा जवळ आला नि नमस्कार करत कडकडुन भेटला.
गृपमेंबर असल्याने गप्पा झाल्यात.
“बापु,तुम्ही येथेच थांबा मी शेंगा आणतो”
असा आग्रह केला.

मी परोपरीने नम्र नकार देत असतांनाही या माणसाने मो.सा.ला किक् मारली
“तुम्ही येथेच थांबा बरं”
हा मनापासुन आग्रह करत दृष्टीआड झाला.
५/१० मिनिटाच्या अंतराने तीन बसेस आल्यात.
पण लिलाधरजींच्या आग्रहाने मला खिळवुन ठेवले होते.
मी फोन लावला.
मी येतोच,जाऊ नका म्हणुन सांगीतले.
माझ्या डोळ्यादेखत गाड्या निघत असल्याने मी तरमळत होतो.
पण
जो शेतकरी राजा अर्ध्या किमी वरच्या शेतात धावत पळत गेलाय त्याचे मन मोडेल म्हणुन मी थांबलो.
या राज्याने शेंगा आणल्यात मला दिल्यात.
तेंव्हा मन भरुन आले.

काय दिले? तिची पैशात किंमत काय?
असे फुटकळ व्यवहारी प्रश्न मला कधी पडत नाही.
त्या मागचे दातृत्व,त्या मागचे प्रेम,त्या मागच्या भावना व त्या मागे दडलेली राज्याच्या काळजाची वृत्ती मोलाची असते.
तिची गणतीही करता येत नाही व किंमतही करता येत नाही ईतकी ती अगणित व अनमोल असते.
लिलाधर भाऊंनी दिलेल्या शेंगांची तर काॅलनीतल्या चार घरात ही भाजी पुरेल.
त्या सर्वांच्या दुवा त्यांना मिळतील.
अशा दुवा असतात म्हणुन शेकडो अस्मानी सुलतानी संकटांना हा शेतकरी राजा पुरुन ऊरतो.
आणि योग पहा मंडळी माझ्या हातातल्या पिशवी वर kisan लिहिलेले दिसत आहे,
धन्यवाद लिलाधरजी..
तुम फुलो फलो
दुधो न्हावो,पुतो फलो
याच कामना …
  ——©MKभामरेबापु
          शिरपुर